Nanded Crime | नायगावच्या आठवडी बाजारात बीडच्या मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ

महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला बिट जमादारानेच ठेचले; बाजारात खळबळ
Nanded Crime | नायगावच्या आठवडी बाजारात बीडच्या मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ
Pudhari
Published on
Updated on

नायगाव : नायगाव येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असतानाच आता थेट बीड जिल्ह्यातून आलेल्या मंगळसूत्र चोरट्यांनी बाजारात शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या एका महिलेकडून मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला पोलीस बिट जमादार साईनाथ सांगवीकर यांनी शिताफीने पकडत मोठा अनर्थ टाळला.

ही घटना गुरुवारी (दि. ५) दुपारी सुमारे ३ वाजता घडली. लालवंडी (ता. नायगाव) येथील निर्मलाबाई बालाजी अभंगे (वय ५३) या आठवडी बाजारासाठी नायगाव येथे आल्या होत्या. याच दरम्यान एका अज्ञात इसमाने “माझ्याकडे सोन्याची बिस्किटे आहेत” असा बनाव रचत त्यांना पशुवैद्यकीय सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील परिसरात नेले.

Nanded Crime | नायगावच्या आठवडी बाजारात बीडच्या मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ
Nanded Crime | मुरली बंधारा खून प्रकरण : २ संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी

तेथे आरोपीने दोन बनावट सोन्याची बिस्किटे दाखवत बोलण्यात गुंतवले. मात्र संशय आल्याने निर्मलाबाईंनी ती बिस्किटे बनावट असल्याचे सांगताच, त्या इसमाने संतापून त्यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे चंपूल-मणी मंगळसूत्र हिसकावून तोडले. एवढ्यावरच न थांबता, “कानातील फुले काढून दे, नाहीतर जिवे मारीन” अशी धमकी देत दहशत निर्माण केली.

घाबरून न जाता निर्मलाबाईंनी जोरात आरडाओरड केली. त्याचवेळी आठवडी बाजारात पेट्रोलिंगवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल साईनाथ सांगवीकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून जाणाऱ्या चोरट्याला रंगेहात पकडले.

Nanded Crime | नायगावच्या आठवडी बाजारात बीडच्या मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ
Nanded Crime | पत्नीनेच केली मुलाच्या मदतीने पतीची हत्या.. मुरली येथील खुनाचा लागला छडा!

तपासात आरोपीने आपले नाव गोवर्धन गणपत गोरे (वय ३५, रा. वाकनपूर, ता. जि. बीड, हल्ली मुक्काम नूर कॉलनी गांधीनगर बीड व सलगरा बुद्रुक, ता. जि. लातूर) असे सांगितले. त्याच्याकडून निर्मलाबाई यांचे अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व दोन बनावट सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस स्टेशन नायगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news