Nanded Mukhed sub district hospital| उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराने रुग्णांचा विश्वास गमावला : आ. डॉ. तुषार राठोड

उपजिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराने रुग्णाचा विश्वास गमावला : आ. डॉ. तुषार राठोड
नांदेड
नांदेड
Published on: 
Updated on: 

मुखेड: उपजिल्हा रुग्णालयात सक्षमपणे रुग्णसेवा दिली जात नसल्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास गमावला. प्रशासनाने वेळीच लक्ष देवून त्यात सुधारणा घडवून आणून दर्जेदार रुग्णसेवा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त आ. डॉ. तुषार राठोड यांनी केली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांची नांदेड येथे आ. डॉ. तुषार राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर चर्चा केली. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्र्यानी विषेश कार्य अधिकारी डॉ. सांगळे यांचे पथक उपजिल्हा रुग्णालय तपासणीसाठी पाठवले होते.

मुखेड उपजिल्हा रुग्णालयात पुर्णवेळ मुख्यालयी राहणारे वैद्यकीय अधिक्षक नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहत नाही. परिणामी, त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. याठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकीय अधिक्षकाची नियुक्ती करावी, कोविड काळानंतर बंद पडलेला अति दक्षता विभाग कार्यान्वित करावा, जुन्या इमारतीची पाहणी करुन नवीन इमारती बांधण्यात याव्यात, अशी सुचना आ. डॉ. तुषार राठोड यांनी केली.

जर कर्मचारी काम करत नसतील त्यांना इतरत्र पाठवा व काम करणा-यांची नियुक्ती करण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात रुग्ण येतात पण वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. ही अक्षम्य बाब असून वरिष्ठांनी याची दखल घेणे अपेक्षित आहे. येथील नर्सेसच्या कार्यतत्परतेमुळे हा दवाखाना चालतो, ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. प्रकाश आबिटकर यांनी तक्रारीची दखल घेऊन पथक पाठवल्याबद्दल आ. राठोड यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी विषेश कार्य अधिकारी डॉ. सांगळे म्हणाले, पंधरा दिवसात रुग्णालयाच्या कामात सुधारणा करा. अन्यथा कारवाईला सामोरे जा. तुषार राठोड व पथक प्रमुखांनी रुग्णालयातील सर्व वॉर्डाची पाहणी केली. त्यावेळी अवश्यक त्या सुचना आमदारांनी केल्या. यापुढे विषय तज्ज्ञ त्याची कामे करतील, याची काळजी घेतली जाईल. डॉ. उपलब्धता वाढवून पूर्णवेळ सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अस्वध्यतेच्या बाबतीत ठोस कार्यवाही करु, भविष्यात बायोमॅट्रिक उपस्थिती बंधनकारक केली जाईल, गरज पडल्यास मानधन तत्वावर खासगी डॉक्टर सेवा घेऊ, आता आवश्यक तेथे ११ महिन्यांसाठी कर्मचारी नियुक्तीचे अधिकार वैद्यकीय अधिक्षकांना देणार येत असल्याची माहिती त्यांनी दिली. .

नांदेड
Nanded DCC Bank Recruitment : नांदेड बँक नोकरभरतीवरअद्यापही स्थगिती कायम!

कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक असली तरी कर्मचारी नांदेड येथे राहून देखील बायोमेट्रीक हजेरी कशी लावतात, याचा शोध घेण्याची सुचना राठोड यांनी केली. या वेळी डॉ.स्वप्निल सांगळे, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. सतिषकुमार साळुंके, विजय कंदेवाड, डॉ. आकाश देशमुख, डॉ. रणजीत काळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पेरके, डॉ. ढगे, ADHS लातुर डॉ. जुमेर, डॉ. नवले यांच्यासह न. प. चे उपाध्यक्ष राजकुमार बामणे, पाणी पुरवठा सभापती विनोद दंडलवाड, स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण, शिवाजी राठोड गणेश अंबेकर, अशोक गजलवाड, बाळु नाईक, मनोज कांबळे उपस्थित होते.

नांदेड
Sachkhand Express delay today: नांदेड येथून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस आज आठ तास उशिरा धावणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.