Nanded Crime | चारचाकी वाहनाची स्टेपनी चोरीच्या संशयातून मारहाण; युवकाचा मृत्यू, दोन आरोपी अटकेत

मुखेड तालुक्यातील खैरका येथील घटना
Youth Killed Nanded Mukhed
Youth Killed Nanded Mukhed Pudhari
Published on
Updated on

Youth Killed Nanded Mukhed

मुखेड : तालुक्यातील खैरका येथील एका युवकाचा चारचाकी वाहनाची स्टेपनी चोरी केल्याच्या संशयावरून झालेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१० जून) उघडकीस आली. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नारायण घुरके (वय ४२, रा. खैरका) हे बुधवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता ज्वारी विक्रीसाठी मोढा येथे एका व्यापाऱ्याकडे गेले होते. यावेळी गजानन माणिकराव सादगीर आणि आप्पाराव बालाजी सूर्यवंशी (दोघेही रा. खैरका) यांनी त्यांना दुचाकीवर बसवून दुसऱ्या ठिकाणी नेले. तेथे चारचाकी वाहनाची स्टेपनी चोरी केल्याच्या कारणावरून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

Youth Killed Nanded Mukhed
Nanded Crime : एकाच दिवशी 62 गुन्हे दाखल; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर घुरके यांना आरोपींनीच चारचाकी वाहन (क्र. एमएच-२४ एबी-७४३५) मधून दुपारी सुमारे २ वाजता मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगताच दोन्ही आरोपी रुग्णालयातून पळून गेल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी विविध तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी घटनास्थळासह संबंधित ठिकाणांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तपासाबाबत माहिती घेतली.

Youth Killed Nanded Mukhed
Nanded Crime : नांदेडमध्ये दोन पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त

याप्रकरणी शशिकला यादव देवकर (रा. तारदरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news