Nanded Court News | मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास; मुखेड न्यायालयाचा निकाल

Mukhed Court Verdict | २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा
nanded crime news
Nanded Crime News : १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावासPudhari FIle Photo
Published on
Updated on

Mukhed POCSO Court Sexual Assault Case

मुखेड: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुखेड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी आरोपी पिराजी मारोती गवाले (रा. बावलगाव, ता. मुखेड) याला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

नेमकी घटना काय होती?

ही घटना १६ मे २०२३ रोजी घडली होती. पीडित मुलगी सकाळी शाळेत आली असताना, ओळखीचा असलेला आरोपी पिराजी गवाले याने तिला 'येवती' येथील जत्रेला जाण्याचे आमिष दाखवले. विश्वासापोटी पीडिता त्याच्या दुचाकीवर बसली. मात्र, आरोपीने तिला जत्रेला न नेता बान्हाळी रोडवरील एका शेतात नेले. तिथे पीडितेने प्रतिकार केला असता, आरोपीने तिला धमकावून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

nanded crime news
Nanded News | नायगाव तालुक्यात वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सोलर प्रकल्पाचे मोठे नुकसान

कायदेशीर कारवाई आणि तपास

पीडितेने घरी परतल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर मुखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयाचा निकाल

खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्त्यांचा युक्तीवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून, न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी १८ मार्च २०२६ रोजी आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

  • पोक्सो कलम ४: २० वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड.

  • कलम ३६३ (अपहरण): ३ वर्षे कारावास आणि ५,००० रुपये दंड.

  • कलम ५०६ (धमकावणे): १ वर्ष कारावास आणि १,००० रुपये दंड.

  • पोक्सो कलम ८: ३ वर्षे कारावास आणि ५,००० रुपये दंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news