Ravindra Chavan : मुखेड, मुदखेड तालुक्यांतील शेतकर्‍यांना अर्थसहाय्य द्या

खा. रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
Rainfall Deficit
मुखेड व मुदखेड तालुक्यांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करून शेतकर्‍यांना आवश्यक मदत व दिलासा देण्यात यावा, अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.pudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड :नांदेड लोकसभा मतदारसंघातील मुखेड व मुदखेड तालुक्यांमध्ये पावसातील मोठ्या खंडामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुखेड व मुदखेड तालुक्यांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करून शेतकर्‍यांना आवश्यक मदत व दिलासा देण्यात यावा, अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करण्यात आला असताना मुखेड व मुदखेड तालुक्यांचा अद्याप समावेश झालेला नाही. या दोन्ही तालुक्यांमध्ये सरासरी पर्जन्यमान कमी असून, पावसातील मोठ्या खंडामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळालेला नाही. तसेच जमिनीची कमी जलधारण क्षमता आणि उपलब्ध जलस्रोतांची परिस्थिती यामुळे खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Rainfall Deficit
Beed News : पंचनामे नको, तातडीने आर्थिक मदत द्या!

मुखेड व मुदखेड तालुक्यातील प्रत्यक्ष पर्जन्यमान, पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध जलस्रोतांचा वस्तुनिष्ठ विचार करून दोन्ही तालुक्यांचा तातडीने ट्रिगर-१ मध्ये समावेश करावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली आहे.शेतकर्‍यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देऊन मुखेड व मुदखेड तालुक्यांना दुष्काळजन्य परिस्थितीत मिळणार्‍या शासकीय सवलती व मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Rainfall Deficit
Flydubai Pilot Attack : फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला; यूएईचा दावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news