Nanded Gambling Raid : जुगार अड्ड्यावर छाप्यात सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जणांवर गुन्हा दाखल

अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुदखेड पोलिस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली
Nanded Gambling Raid
Nanded Gambling Raidpudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड: नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मुदखेड पोलिस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील ईजळी शेतशिवातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर 'अंदर बाहर' जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, तब्बल ३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​२४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुदखेड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ईजळी रेल्वे रूळाजवळ काही इसम बेकायदेशीररीत्या जुगार खेळत होते. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ छापा टाकला. कारवाईदरम्यान मोहम्मद सलमान मोहम्मद युनुस (रा. नवी आबादी, मुदखेड), कपिल सोपान हटकर, अरविंद बाबाराव मुंगल, राष्ट्रपाल दिगंबर हटकर (सर्व रा. ईजळी), गजानंद उत्तमराव कळणे (रा. सरेगाव), कृष्णा गणेश पवार व बाळू पवार (दोघे रा. निवधा), रामप्रसाद नारायण मुचकलवाड (रा. मैडका) आणि गंगाधर लोंढे (रा. बारड) हे नऊ जण जुगार खेळताना आढळून आले.

Nanded Gambling Raid
Ashok Chavan RSS Event : रा.स्व.संघ पदाधिकार्‍यांसाठी खा.चव्हाणांच्या संस्थेत ‘रेड कार्पेट!’

​पोलिसांनी घटनास्थळावरून ४ मोबाईल (किंमत ४०,००० रुपये), ४ मोटारसायकल (किंमत २,७०,००० रुपये), ७,५०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३,१७,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश नंद, आकाश सरोदे, सुरेश जाधव व मुदखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.

Nanded Gambling Raid
Latur Gutkha Seizure : दहा लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित जर्दा जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news