

Nanded MLA Chikhalikar criticizes MLA Pawar.
संजीव कुळकर्णी
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्याच मित्रपक्षाचे आमदार राजेश पवार यांच्यावर त्यांच्या मतदारसंघात जाऊन केलेल्या बोचऱ्या टीकेची आ.पचार यांनी नांदेड जिल्हा बँकेतील नोकरभरतीच्या बहुचर्चित विषयावरून विधानसभेच्या सभागृहात परतफेड केल्याचे समोर आले आहे.
आ. चिखलीकर हे जिल्हा बँकेतील एक ज्येष्ठ संचालक असून तीन महिन्यांपूर्वी या बँकेतील प्रस्तावित नोकर भरतीतील त्यांचा 'प्रताप' स्थानिक पातळीपासून शासन दरवारापर्यंत गाजला होता. बँकेत भरण्यात येणाऱ्या १५६ जागांची वाटणी संचालकांनी आपसांत करून घेतली. त्यात एका ज्येष्ठ संचालकाने अतिरिक्त २० जागा आपल्या वाट्यास घेतल्याचा मुद्दा तर खूपच चर्चमध्ये आल्यानंतर सहकार आयुक्तालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयातपर्यंत तक्रारी दाखल झाल्यामुळे शासनाने या नोकरभरतीस ब्रेक लावला.
या प्रकरणाच्या निमित्ताने चिखलीकर आणि पचार या आमदारद्वयांतील राजकीय बाद जाहीर झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आ. पवार यांच्या मतदारसंघातील बरबडा या गावी झालेल्या 'राष्ट्रवादी'च्या एका कार्यक्रमात चिखलीकर यांनी बँकेच्या चिषयास स्पर्श न करता राजेश पवार यांच्या कार्यशैलीवर जोरदार निशाणा साथला होता; पण त्या टीकेला पवार यांनी स्थानिक पातळीवर उत्तर देण्याचे टाळले होते.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात आपापल्या मतदारसंघांतील प्रश्न जोरकसपणे मांडले. इतर कोणत्याही आमदारांनी नांदेड जिल्हा बँकेच्या विषयात हात घातला नाही; पण आ. पवार यांनी हा विषय उपस्थित करताना चिखलीकरांचा घेट उल्लेख न करता नोकरभरती प्रक्रियेत त्यांनी केलेल्या प्रतापों कडे सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. नोकरभरतीच्या निमित्ताने बँकेच्या काही संचालकांनी इच्छुकांकडून मोठी माया गोळा केल्याचा आरोप करतानाच त्यांनी चिखलीकरांचे नाव न घेता त्यांनी आपल्या वाट्याला २४ जागा घेतल्या, असा गौप्यस्फोट केला.
आ. पवार यांनी केलेले आरोप सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी फेटाळले नाहीत. शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार नांदेडसह कोणत्याही जिल्हा बँकांतील नोकरभरती पारदर्शीपणे होईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी विधानसभेत दिली. त्यानंतर पवार यांच्या यंत्रणेने विधानसभा सभागृहातील वरील विषयातील प्रश्नोत्तराचे ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांतून पसरविल्याचे दिसून आले.