

मुखेड : निवडणुक आयोगाच्या आदेशानंतर जाहीर झालेल्या सुधारीत निवडणुक कार्यक्रमानंतर10 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेहाना आमजद पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत अटळ आहे.
निवडणुक जाहीर झाल्यापासून भाजप प्रचारात आघाडीवर आहे. आमदार डाॅ. तुषार राठोड व माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड ह्यानी प्रचार यंत्रणा नियोजनबद्द राबवली. त्यांनी प्रत्येक मतदाराच्या भेटी घेण्यावर भर दिल्याने व काॅर्नर सभा घेवुन जनसंवाद साधण्यावर भर दिल्याने ही निवडणुक भाजपा उमेदवारासाठी निर्णायक होणार असल्याचा राजकीय निरक्षकाचा अंदाज आहे.
शिवसेना शिंदे गटानेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत प्रत्येक वार्डात घरोघरी भेटी देवुन आपली प्रचार यंत्रणा सक्रिय केल्याचे दिसुन येते. या वेळी काँग्रेसचाच उमेदवार निवडुन येणार हा आत्मविश्वास घेवुन काॅग्रेस पक्ष घरोघरी जावुन मतदाराचे अशिर्वाद घेत आहेत. सध्यस्थितीत तिन्ही पक्षाचे उमेदवार आपला दावा सांगत असले तरी नगराध्यक्ष पदाच्या मुस्लिम उमेदवाराने माघार घेतली.
निवडणुक कोणाच्या फायद्याची ठरणार यावर शहरात चर्चा होताना दिसुन येते. यातही शिस्तबद् प्रचार केलेली विकास कामे, राज्य सत्तेचा केंद्रबिंदु असलेल्या भाजपा हे पद मिळवण्यात यशस्वी होण्याची शक्यता असली तरी शिवसेना व काँग्रेस तुल्यबळ लढत देण्याच्या तयारीत असताना मतदार राजा कोणाला या पदावर विराजमान करणार हे पहावे लागणार आहे.