Nanded Mayor Election : महापौरपदाच्या उमेदवार निवडीसाठी आज भाजप नगरसेवकांची बैठक!

खा.अशोक चव्हाण, खा. अजित गोपछडे करणार स्वतंत्र चर्चा
Nanded Mayor Election
महापौरपदाच्या उमेदवार निवडीसाठी आज भाजप नगरसेवकांची बैठक!Pudhari News Network
Published on
Updated on

नांदेड ः नांदेडच्या महापौरपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची उद्या बुधवारी खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती असून या बैठकीत महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.

नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवड 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी 10 तारखेला सकाळी 11 वाजता पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत मनपाची विशेष सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा पहिला महापौर कोण, याबाबत तर्क-वितर्क काढले जात आहेत.

Nanded Mayor Election
Nanded Akashvani : जिथे कट्टरतावादाची चेतना...तिथे भक्तिसंगीत चालेना...!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वीच महापौरपदाच्या उमेदवार प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत ठरविला जाणार असल्याचे भाष्य केले होते. त्यामुळे महापौर निवडीबाबत उत्सुकता वाढली आहे. खा.अशोक चव्हाण आणि खा.अजित गोपछडे बुधवारी नवी दिल्लीहून नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर रात्री उशीरा नगरसेवकांच्या बैठकीत प्रत्येक नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा करून त्यांची मते जाणून घेतील. संसदेच्या अधिवेशनापुर्वी या दोन्ही खासदारांनी नगरसेविकांची बैठक घेवून त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली होती.

Nanded Mayor Election
Beed News : बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

महापौर-उपमहापौर पदासाठी गुरुवार दि. 5 फेब्रुवारीला इच्छूक उमेदवार अर्ज घेऊ शकतात. शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ असून 10 फेब्रुवारीला अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर नव्या महापौर-उपमहापौरपदाची घोषणा होईल, असे अधिकृत सुत्रांकडून समजले.

  • बुधवारी नगरसेवकांच्या बैठकीचा आढावा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार आहे. बैठकीत महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार निश्चित झाल्यास त्याचीही माहिती श्रेष्ठींकडे पाठवली जाईल. कोअर कमिटीच्या बैठकीतून आलेल्या नावाचा अर्ज कायम ठेवून उर्वरित इच्छुकांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news