Sunetra Pawar | बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

लोहा तालुक्यातील बामणी, सोनखेड, धावरी फाटा परिसरात सोयाबीन पिकांची पाहणी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
Loha Tehsil Drought Affected Farmland
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाPudhari
Published on: 
Updated on: 

Loha Tehsil Drought Affected Farmland

लोहा : पावसामुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील बामणी फाटा, सोनखेड आणि धावरी फाटा परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी शिवाजी वाघमारे, संदीप जायभाये यांच्यासह अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पिकांची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि उत्पादनावर झालेला परिणाम याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच शेतीतील अडचणी, पुढील हंगामासाठीच्या गरजा आणि नुकसानभरपाईबाबतच्या अपेक्षाही जाणून घेण्यात आल्या.

Loha Tehsil Drought Affected Farmland
Nanded News : ८२८ समाजकंठकांना गावात येण्यास बंदी

“बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ कागदोपत्री नोंदवून न ठेवता त्यावर प्रत्यक्ष आणि जलद कार्यवाही होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Loha Tehsil Drought Affected Farmland
Nanded News | शासन मंजुरी मिळाली; ढाणकीतील अप्पर तहसीलदार कार्यालय कधी सुरू होणार?

शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन गरजा तसेच पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. संकटाच्या काळात शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.

सोयाबीनसह अन्य पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तहसीलदार विठ्ठल परळीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, प्रवीण चिखलीकर, माधव पावडे, नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करिम शेख यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news