Nanded Crime : किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त

१ लाख ३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Nanded Gutkha Manufacturing
Nanded Crime : किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्तPudhari
Published on
Updated on

किनवट : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर असा एकूण १ लाख ३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल किनवट पोलिसांनी जप्त केला. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत २६ ऑगस्ट रोजी किनवट पोलिसांनी ही कारवाई केली. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती व साठवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घरावर छापा टाकून पंचांसमक्ष झडती घेतली.

या झडतीमध्ये गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत १ लाख ३ हजार ८०० रुपये आहे. याप्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद जाधव, पोलीस उपनिरीक्षक सतीश लेखुळे, देवानंद फडेवार, पोलीस अंमलदार दिलीप सिरमनवार, महिला पोलीस अंमलदार मंजूताई पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल माहुरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news