Minor Girl Kidnapping | नांदेड ते परभणी अपहरणाचा असा लागला छडा; 17 वर्षीय मुलगी सापडली परभणीत

Minor Girl Kidnapping | नांदेड येथून अपहरण झालेली १७ वर्षीय मुलगी परभणी रेल्वे स्थानक परिसरात संशयित अवस्थेत फिरताना आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
Minor Girl Kidnapping | नांदेड ते परभणी अपहरणाचा असा लागला छडा; 17 वर्षीय मुलगी सापडली परभणीत
Published on
Updated on

नांदेड येथून अपहरण झालेली १७ वर्षीय मुलगी परभणी रेल्वे स्थानक परिसरात संशयित अवस्थेत फिरताना आढळून आल्याची घटना समोर आली आहे. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही अल्पवयीन मुलगी सुखरूप सापडली असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला तिच्या आई आणि नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Minor Girl Kidnapping | नांदेड ते परभणी अपहरणाचा असा लागला छडा; 17 वर्षीय मुलगी सापडली परभणीत
Vishwa Marathi Sammelan Nashik | सातासमुद्रापार मराठी शाळेची घंटा; कॅनडा, अमेरिकेत हजारो मुले गिरवताहेत मराठीचे धडे

या संदर्भात अधिक माहिती अशी की, नांदेड रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत दुरक्षेत्र परभणी येथील पोलीस हवालदार राम बा. कातकडे, महिला पोलीस शिपाई शीतल वाघमारे आणि महिला पोलीस शिपाई पूजा भरकड हे सोमवारी (दि. २) सायंकाळी सुमारे ४.३० वाजता परभणी रेल्वे स्थानक परिसरात नियमित पेट्रोलिंग गस्त घालत होते.

यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद हालचाली करताना त्यांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तत्काळ तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिचे नाव आरती सुरेश कांबळे (वय १७, रा. आंबानगर, सांगवी, ता. जि. नांदेड) असल्याचे स्पष्ट झाले.

Minor Girl Kidnapping | नांदेड ते परभणी अपहरणाचा असा लागला छडा; 17 वर्षीय मुलगी सापडली परभणीत
Jalgaon Heatwave | जळगावची भट्टी पेटली! मार्चच्या सुरुवातीलाच पारा 36 पार; अवघ्या 72 तासांत उष्णतेचा 'धडाका'

पुढील चौकशीत ती नांदेड येथून अपहरण झालेली असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड येथे संपर्क साधण्यात आला असता गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२/२०२६, कलम १३७ (२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करत असल्याचे समजले.

दरम्यान, नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कैलास राठोड तसेच मुलीची आई पूजा सुरेश कांबळे (वय ४०, व्यवसाय मजुरी, रा. आंबानगर सावंगी, नांदेड) हे रात्री ८ वाजता दुरक्षेत्र परभणी येथे दाखल झाले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरूप सापडल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड यांच्याकडून सुरू आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील गस्त आणि दक्षतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news