Nanded News : खैरगाव शिवारात अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

ओळख पटविण्याचे नायगाव पोलिसांचे आवाहन
Heatwave Death
उष्माघाताने मृत्यू
Published on
Updated on

नायगाव : तालुक्यातील खैरगाव शिवारात एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. प्रखर उन्हामुळे प्रकृती बिघडून संबंधित वृद्धाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने नायगाव पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरगाव शिवारातील एका परिसरात वृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६५ ते ७० वर्षांच्या दरम्यान असून अंगात साधे कपडे असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरात तीव्र उष्णतेची लाट सुरू असल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नायगाव पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास तात्काळ नायगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news