Nanded Accident |हिमायतनगरमध्ये ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार, एक गंभीर जखमी

हिमायतनगर -सिरंजनी रोडवर भीषण अपघात
Nanded Accident |हिमायतनगरमध्ये ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
Pudhari
Published on
Updated on

Himayatnagar road accident

हिमायतनगर : हिमायतनगर -सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला आहे. या घटनेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

हिमायतनगर शहरातील शासकीय धान्य गोदामातून मौजे कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक (MH26-7776) ने सिरपल्ली–सिरंजनी मार्गे येणाऱ्या दुचाकी (MH29-AZ 4538) ला जोरदार धडक दिली. ही घटना एचपी गॅस गोडाऊनसमोर मुख्य रस्त्यावर घडली.

Nanded Accident |हिमायतनगरमध्ये ट्रकची दुचाकीला जोराची धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
Nanded Accident | हदगाव–तामसा मार्गावर कारची दुचाकीला धडक: चौघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

या अपघातात दुचाकिवरील गणेश सदाशिव जाधव (वय 55, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील शंकर विठ्ठल वानखेडे (वय 40, रा. सिरपल्ली) हे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भयंकर होता की ट्रकच्या समोरील भागात दुचाकी अडकली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉ. संदीप वागतकर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास हिमायतनगर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news