

हिमायतनगर : जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर वनराई कच्चे बंधारे बांधण्याची मोहीम 7 डिसेंबर ते 21 पर्यंत हाती घेतली आहे. हिमायतनगर तालुक्यातील नरेंद्राचार्य महाराज यांच्या सत्संगातील भक्तांनी श्रमदानातून बंधारे उभारले असुन या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा होणार असुन या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला,कामारी सह अन्य तिन एकुण पाच गावांमध्ये प्रत्येकी पाच वनराई बंधारे उभारले जाणार आहेत. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून सत्संग भक्तांच्या बंधारे उभारण्याचे योगदान सुरू आहे. कारला ,कामारी गावांमधील सत्संग भक्तांनी जवळपास सात वनराई बंधारे उभारले आहेत. मुख्य नाल्यावर वनराई बंधारे उभारले असून या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे जवळपास च्या शेतकऱ्यांना शेती पिकासाठी मोठा फायदा होणार आहे.
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांची संकल्पना अतिशय उपयुक्त असुन तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा संदेश या बंधाऱ्याच्या माध्यमातून सफल होणार आहे. हे वनराई बंधारे उभारण्याचे काम सत्संग मंडळाचे अध्यक्ष शिवाजी एटलेवाड, आनंद रासमवाड, दत्ता शिरफुले,इश्वर एटलेवाड, गणपत यमजलवाड, पांडुरंग यमजलवाड, मुकींद गोणेवाड, आशाताई बोयले, अर्चनाबाई चिंतलवाड, सुमनबाई इटेवाड, लक्ष्मीबाई रासमवाड, ज्योती रासमवाड या महिला पुरुष भक्तांनी पुढाकार घेऊन सात बंधारे उभारले असुन भक्तांच्या श्रमदानाचे कौतुक गावकऱ्यांनी केले आहे.