Nanded heavy rainfall : नांदेड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

माहूरमध्ये १८८ मि.मी. : विष्णुपुरी प्रकल्पाच्या साठ्यात ८.३३ टक्क्यांची भर
Nanded heavy rainfall
Nanded heavy rainfallpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : गुरुवारी (दि. ३०) रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू होता. या दरम्यान जिल्ह्याच्या सोळा तालुक्यातील एकूण ९३ मंडळांपैकी ७३ मंडळात अतिवृष्टी झाली. किनवट तालुक्यातील आज रोजी अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली असून वार्षिक सरासरीच्या ४६.४९ टक्के पाऊस पडला. पेरणी १०० टक्के पूर्ण झाली असून विष्णुपुरी प्रकल्पात ६.७३० दलघमी या प्रमाणात आवक सुरू असल्याने २४ तासात ८.३३ टक्क्यांची भर पडून उपयुक्त साठा ३३.९४ वरून ४२.२७ टक्के झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता हे चित्र होते.

चालू आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी (दि. २७) जिल्हाभरात २५५.६० मिलीमीटर पाऊस पडला होता. शुक्रवारी (दि. ३१) ४१४ मिलीमीटर पर्यंत हा प्रवास पोचला. गतवर्षी ३१ जुलै रोजी ३४७.१० मिमी पाऊस पडला होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो ३९.०४ टक्के होता. तर २०२४ साली याच दिवसापर्यंत ४५४.८० मिमी पाऊस पडला होता.

Nanded heavy rainfall
Snake Bite Death | सर्पदंशाने नगर परिषद कर्मचाऱ्याचा मृत्यू

यंदा तो ४१४.४० मिमी पडला आहे. या पावसाळ्यात आजपर्यंत वेगवेगळ्या दिवशी तीन वेळा अतिवृष्टी झाली असून शुक्रवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार ९३ पैकी ७३ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. अन्य तालुक्यांच्या तुलनेत वार्षिक पर्जन्यमान अधिक असलेल्या किनवट, माहूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून माहूरमध्ये तब्बल ६०७7 मिमी पाऊस आजवर पडला. किनवट तालुक्यात ६०५ मिमी पाऊस पडला.

दि. १ जून पासून दि. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित आहे, त्या तुलनेत १०३.७० टक्के पाऊस झाला आहे. तर वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ४६.४९ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात खरीप हंगामाचे जेवढे पेरणीयोग्य क्षेत्र आहे, त्या क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून मागील दोन दिवसांत भीज पाऊस झाल्याने पिकांसाठी तो पोषक ठरला आहे. शुक्रवारी पावसाने बराच वेळ विश्रांती घेतली होती. दुपारनंतर पावसाचा अंदाज होता. ९ मंडळामध्ये १०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला ; परंतु पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. वास्तविक अलिकडेच पेरण्या झाल्याने पीक अद्याप बाल्यावस्थेत आहेत.

Nanded heavy rainfall
Tuljabhavani Temple : जीर्णोद्धाराची कामे निर्विघ्नपणे होण्यासाठी मंत्रपठण विधी

'विष्णुपुरी'च्या साठ्यात साडे आठ टक्क्यांची भर

संततधार भीजपाऊस सर्वदूर सुरू असल्याने जलाशयात आवक सुरू झाली आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात ६.७३० दलघमी या प्रमाणात आवक सुरू असल्याने एक दिवस अगोदर ३३.९४ टक्क्यांवरून जलसाठा शुक्रवारी सकाळी ४२.२७ टक्क्यांवर पोहोचला होता. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीत १०९.५४ दलघमी आवक सुरू असून ते आता ७३.६८ टक्के भरले आहे. माजलगाव प्रकल्पात १६.४१, येलदरी ५६.१५, सिद्धेश्वर ८.५७, लोअर दुधना २३.५१, अपर मानार (लिंबोटी) ३०.५५, लोअर मानार (बारुळ) ४८.७४, तर इसापूर (जि. वाशिम) धरणात ५२.४९ टक्के जलसाठा झाला आहे.

२४ तासांत पडलेला तालुकानिहाय पाऊस

शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद वगळता अन्य १५ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस माहूर तालुक्यात १८८.३० मिमी पडला आहे. याशिवाय नांदेड ८४.२०, बिलोली ६५.९०, मुखेड ७३, कंधार ८४.९०, लोहा ९०.७०, हदगाव ८९.३०, भोकर ६७, देगलूर ७०.३०, किनवट १२९.२०, मुदखेड १०७.८०, हिमायतनगर ६९.९०, माहूर १८८.३०, धर्माबाद ५५.६०, उमरी ७५.५०, अर्धापूर ९१.५० आणि नायगाव तालुक्यात ६६.७० मिमी पाऊस पडला.

उमरी बाजार मध्ये २५१.५० मिलीमीटर पाऊस

पुष्य नक्षत्राच्या पावसाने माहूर व किनवट तालुक्यात धुमाकूळ घातला असून उमरीबाजार (ता. किनवट) येथे २४ तासात २५१.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर माहूर शहर व परिसरात तब्बल २२३ मिलीमीटर पाऊस पडला. त्या खालोखाल वाई व सिंदखेड (ता.माहूर) तसेच किनवट तालुक्यातील दहेली मंडळात १९४.५० मिमी पाऊस पडला. याशिवाय वानोळा १४१, सिंदगी १४१, जलधरा १२९ (ता. किनवट), उमरी (ता. उमरी) (१०४), हदगाव तालुक्यातील तळणी १०९.५०, निवघा ११३, मुखेड तालुक्यातील चांडोळा १३९ मिलीमीटर पाऊस पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news