Nanded Crime : पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस; आरोपीला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Nanded Crime News
Nanded Crime Newspudhari photo
Published on
Updated on

नांदेड : हदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीचे सत्र लावून नागरिकांची झोप उडवणाऱ्या एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाळ्यात पकडले. आर्यन अरुण कोरी (वय २१, रा. बुटीबोरी, नागपूर; मूळ रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे हदगाव पोलिस ठाण्यातील तब्बल पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गोविंद खैरे व त्यांचे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, हदगाव येथील घरफोडीतील संशयित नांदेड मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपी आर्यन कोरी याला ताब्यात घेतले.

Nanded Crime News
Nanded city encroachment : तरोडा नाका मोकळा श्वास कधी घेणार?

​कडक चौकशीदरम्यान आरोपीने त्याचा फरार मित्र शाहरुख ऊर्फ रहिम शेख अबुबकर सिद्दीकी (रा. हदगाव) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या अंगझडतीतून १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि २५ हजार रुपयांचा ॲपल आयफोन, असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि गोविंद खैरे, हबीब चाऊस, राजू डोंगरे आणि शेख उमर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पुढील कायदेशीर तपासासाठी आरोपीला हदगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Nanded Crime News
Latur News : अहिल्यादेवींच्या नावाने कर्जमुक्ती योजना; बॅनरवर मात्र त्यांचाच फोटो गायब!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news