नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक; नायगाव पोलिसांत गुन्हा

नांदेड : नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक; नायगाव पोलिसांत गुन्हा
Published on
Updated on

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी नायगाव पोलिसांत पती-पत्नी विरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील टेंभुर्णीच्या युवकाची शाळेवर नोकरी लावण्याचे अमिष देऊन पाच लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांत तक्रार देऊनही यावर दुर्लक्ष करण्यात आल्याने या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून नायगाव पोलीस ठाण्यात जगदीश तुकाराम घाटे व सिंहाबाई जगदीश घाटे (रा. देगलूर) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथील राहूल गणपत टेंभुर्णीकर याने २०१५ मध्ये जगदीश तुकाराम घाटे व सिंहाबाई जगदीश घाटे यांना पाच
लाख रुपये उसणवारीवर दिले होते. हात उसणे घेतलेली रक्कम परत मिळण्यासाठी टेंभूर्णीकर यांनी घाटे दांपत्याकडे वेळोवेळीमागणी केली.पण नेहमी टाळाटाळ करीत घाटे दाम्पत्य यांनी वेगळा पायंडा रचला.

पैसे परत देण्याऐवजी शाळेवर नौकरी लावण्याचे अमिष दाखवले. पण २०१५ पासून पैसेही परत दिले नाहीत व नोकरीही लावली नाही त्यामुळे घाटे दांपत्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राहूल टेंभूर्णीकर यांनी पुराव्यासह नायगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

नायगाव पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद केला नसल्याने त्यांनी नायगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली. सदर प्रकरणी न्याधिशांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. यावरून देगलूर येथील जगदीश तुकाराम घाटे व सिंहाबाई जगदीश घाटे या दांपत्याविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिकचा तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शिवकुमार बाचावार हे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news