

नांदेड : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. त्यासाठी भारतासह परदेशातून भाविक शाहीस्नानसाठी जात आहेत. नांदेडमधूनही अनेक भाविक प्रयागराजसाठी जात आहेत.
शनिवारी (द.१५) नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने प्रयागराजसाठी निघाले. परंतु, रविवारी (दि.१६) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही टेम्पो ट्रॅव्हल उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणीकटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर धडकली. यामध्ये चार जण ठार झाले असून, ३१ भाविक हे जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये सुनील दिगांबर वरपडे (वय ५०), अनुसया दिगांबर वरपडे (वय ८०), दीपक गणेश गोदले स्वामी (वय ४०, तिघेही रा. छत्रपती चौक, नांदेड) आणि जयश्री कुंडलिकराव चव्हाण ( वय ५०, रा. आडगाव रंजेबुआ ता. वसमत) यांचा समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये चैतन्य राहुल स्वामी (वय १६), शिवशक्ती गणेश गोदले (वय ५५), भक्ती दीपक गोदले (वय ३०), रंजना रमेश मठपती (वय ५५), गणेश गोदले (वय ५५), अनिता सुनील वरपडे (वय ४०), वीर सुनील वरपडे (वय ९), सुनिता माधवराव कदम (वय ६०), छाया शंकर कदम (वय ६०), ज्योती प्रदीप गैबडी (वय ५०), आर्या दीपक गोदले (वय ५), लोकेश गोदले (वय ३५), श्रीदेवी बरगले (वय ६०, सर्व राहणार छत्रपची चौक नांदेड) यांचा समावेश आहे.