Nanded Crime | देगलूर खून प्रकरणातील २ संशयित आरोपींना सत्र न्यायालयाकडून जामीन

बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला
bail
bail file photo
Published on
Updated on

Biloli sessions court bail granted

हणेगाव : देगलूर तालुक्यातील मरखेल पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरणात अटकेत असलेल्या दोघा आरोपींना बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपी बालाजी मारोती गंदमुळे आणि हुल्लपा ज्ञानोबा गंदमुळे यांना शुक्रवारी (दि. २४) अटींसह जामीन देण्यात आला.

या प्रकरणात आरोपींनी नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. अंकुशराजे तुळशीराम जाधव यांनी सविस्तर युक्तिवाद करत गुन्हा नोंदविण्यात झालेला विलंब, तपासातील त्रुटी आणि घटनाक्रमातील विसंगती यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, आरोपींविरुद्ध ठोस व विश्वासार्ह पुरावे नसून केवळ संशयाच्या आधारे त्यांना गुंतविण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

bail
Nanded Crime | दिव्यांग अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी नायगावातील आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर तसेच तेवढ्याच रकमेच्या एका सक्षम जामीनदाराच्या अटीवर मुक्त करण्याचे आदेश दिले. यासोबतच तपास यंत्रणेस सहकार्य करणे आणि पुढील सुनावणीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, देगलूर यांच्या न्यायालयात हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या प्रकरणात अ‍ॅड. जाधव यांनी मुख्य युक्तिवाद केला असून त्यांना अ‍ॅड. सद्दाम शेख दावणगीरकर व अ‍ॅड. विठ्ठल जेठे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news