Nanded DCCB election : जिल्हा बँक निवडणुकीत तरुण तुर्कांचे आव्हान

बँक बचाव आघाडीच्या माध्यमातून शेतकरी विकास पॅनलची घोषणा
Nanded DCCB election
Nanded DCCB electionpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील विविध पक्षांतील नेते एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. मात्र या प्रयत्नांना भोकर मतदारसंघातच तरुण तुर्कांनी सुरुंग लावल्याने माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांना निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून बँक बचाव आघाडीच्या माध्यमातून 'छत्री' या निशाणीवर आठ उमेदवारांच्या माध्यमातून शेतकरी विकास पॅनलने आव्हान उभे केले आहे.

या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभाव क्षेत्रातील भोकरमधील तरुण तुर्कांचे आव्हान. येथील मुदखेड पतसंस्था मतदारसंघातून मारोतराव पाटील व्यवहारे यांच्या उमेदवारीने खा. चव्हाण यांची डोकेदुखी वाढवली आहे. छाननीदरम्यान त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरणार नाही असे वाटत असताना विभागीय सहनिबंधकांकडे अपिलानंतर त्यांचा अर्ज वैध ठरला आणि खा. अशोक चव्हाण यांच्या टीमला मोठा धक्का बसला.

Nanded DCCB election
Thane Palghar District Central Cooperative Bank Election : जिल्हा बँकेत भाजप विरुद्ध भाजप सामना रंगणार

या प्रक्रियेत प्रा. संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी कायदेशीर आधार घेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. विभागीय सहनिबंधकांनी व्यवहारे यांचा अर्ज वैध ठरविल्याने मुदखेड मतदारसंघातील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

जिल्ह्यातील ११ वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली असली तरी १२ ठिकाणी निवडणुका होणार आहेत. दरम्यान, आता आठ उमेदवारांनी एकत्र येत 'बँक बचाव आघाडी शेतकरी विकास पॅनल'ची स्थापना केली.

या पॅनलमधून अ मतदारसंघातील भोकर तालुक्यातून माधवराव मातूळकर, अर्धापूरमधून ज्ञानेश्वर राजेगोरे, मुदखेडमधून मारोतराव व्यवहारे, माहूरमधून ज्योतिबा खराटे, धर्माबादमधून गोविंदराव जाधव, इतर मागासवर्गीय मतदार संघातून ज्ञानेश्वर राजगोरे, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून उकंडराव जाधव आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून प्रतिभा येरडलावार यांनी शड्डू ठोकल्याने जिल्हा बँक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Nanded DCCB election
Thane District Bank: जे गेले ते माझ्यासाठी मेले, नातेवाईक वगैरे कोणी नाही; आमदार हितेंद्र ठाकूर

या पॅनलच्या निवडणुक पत्रकावर बँकेचे आधारवड राहिलेल्या पद्मश्री शामराव कदम यांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. तिरुपती कोंडेकर यांचे वडील जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले असून त्यांनी मात्र या निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेली नाही.

भोकरमध्ये देशमुख - कोंडेकर यांचे आव्हान!

भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड, अर्धापूर आणि भोकर या तीन तालुक्यातील बँक निवडणुकीत काँग्रेसचे संदीपकुमार देशमुख बारडकर आणि तिरुपती कोंडेकर यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. व्यवहारे यांचा अर्ज टिकवण्यात देशमुख यांच्या कायदेशीर लढाईची चर्चा जिल्हा बँक कार्यालयापासून जिल्हाभर सुरू आहे. या निर्णयामुळे खा. अशोक चव्हाण यांना भोकरमध्येच आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news