

हदगाव : शहरातून भर चौकातून चार चाकी वाहन (दि.३१) डिसेंबरच्या रात्री चोरण्यात येते त्याचा अध्याप शोध लागत नाही.तसेच (दि.२७) डिसेंबर रोजी हदगाव बस्थनकात महिला प्रवासी सुमारे अडीच लाख रुपये सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहे.असे एक ना अनेक गुन्हे हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सातत्याने होत असून यामध्ये घरफोडी चोरी इतर गंभीर गुन्हयाची नोंद ही आहेत.पोलीस स्टेशन स्तरावर तपास मात्र न होत असल्याचे दिसून येत आहे.या कारणाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आढावा घेण्याची आवश्यकता आहे.कारण पोलीसांच्या अशा कार्यशैलीमुळे नागरिकात प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील एक युवक केतन वानखेडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.माझे काका राजेंद्र वानखेडे यांच्या नावे असलेले अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन (एम.एच.२६ सी.एच.०६८६ या नंबरची चारचाकी गाडी रोडवरील भाग्यलक्ष्मी टेंडर्स समोर (दि.३) डिसेंबर रोजी उभे केले होते.दुसऱ्या दिवशी दुकानदार दुकान उघडण्यासाठी गेलो असता तिथे वाहन दिसून आलेले नाही.शोध घेतला असता वाहन कुठेच नसल्याचे समजले आहे.
सदरील शहरातील महिला राहीन बेगम सलमान खान ही महिला बाहेरगावी जाण्यासाठी हदगाव शहराच्या बसस्थानकावर आली असता गर्दीचा फायदा उठवून अज्ञात चोरट्यांनी त्याचे पर्स पळविले त्या पर्समध्ये ठेवलेल्या डब्यात सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते.असं त्यांनी पोलीस स्टेशनच्या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे.हदगाव शहरात परिसरात या पूर्वी चोरी केलेले चोरटे अन्य पोलीस स्टेशन चोरी केल्याची कबुली देतात परंतु याबाबत हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस त्या चोरांची चौकशी करायला हवी असा सवाल नागरिकातुन करण्यात येत आहे.मागील वर्षात दाखल गुन्हे आणि त्यापैकी उघड होणे यात मोठी तफावत असल्याची माहिती आहे.
हदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे काही दिवसा पासून पोलीस स्टेशनद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवून चर्चेत असतात परंतु हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा घडल्यानंतर नोंद नंतर तपास योग्य दिशेने होणे आवश्यक आहे याकरिता पोलीस व नागरिक यांचा समन्वय पण महत्त्वाचं आहे अस सुजान नागरिकांचे म्हणने आहे.