Bribery case nanded : तीन हजाराची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी जेरबंद

धर्माबाद तालुक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारवाई
Bribery case
Bribery casepudhari photo
Published on
Updated on

धर्माबाद: तालुक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रात एक मोठी कारवाई उघडकीस आली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३ ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bribery case
Bribery Case: अटक टाळण्यासाठी ४ लाखांची मागणी; पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

लाचेची पार्श्वभूमी

प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदाराच्या वार्षिक कार्य मूल्यमापन अहवालावर अभिप्राय नोंदवून स्वाक्षरी करण्यासाठी आणि तो पुनर्विलोकनासाठी नांदेड येथील जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडे सादर करण्यासाठी डॉ. मोरे यांनी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) अधिकृत तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची खात्रीशीर पडताळणी केली. पडताळणीदरम्यान, डॉ. मोरे यांनी ४ हजार रुपयांऐवजी तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून ही रक्कम स्वीकारताना त्यांना जेरबंद करण्यात आले.

Bribery case
Pune Talathi Bribery Case: दोन कोटींचा दंड टाळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याचा आरोप; तलाठी आणि कोतवालावर गुन्हा दाखल

कायदेशीर कारवाई व तपास पथक

आरोपी डॉक्टर मोरे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या धर्माबाद येथील निवासस्थानाची देखील झाडाझडती घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोलीस हवालदार कैलास मगर, यशवंत दाबनवाड, राजेश राठोड, श्याम गोरपले आणि चालक पोलीस हवालदार प्रकाश मामुलवार यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news