Nanded Crime | मोहफुलापासून अवैध दारूनिर्मितीवर किनवट पोलिसांचा छापा; 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

किनवट तालुक्यातील भुलजा शिवारात सुरू होता अवैध व्यवसाय
Nanded Crime
Nanded Crime
Published on
Updated on

किनवट : तालुक्यातील भुलजा शिवारात सुरू असलेल्या अवैध दारूनिर्मितीच्या ठिकाणावर किनवट पोलिसांनी कारवाई करत मोहफुलाच्या आंबवलेल्या रसायनयुक्त पदार्थाचा मोठा साठा जप्त केला. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे 36 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.16) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मौजे भूलजा शिवारातील तोटरे यांच्या वीटभट्टीजवळील झोपडीच्या अंगणात ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी नानंग गोबरा ढमाळ (वय 45, रा. बोधडी खुर्द, ता. किनवट) हा अवैधरित्या मोहफुलापासून दारू निर्मितीसाठी रसायनयुक्त पदार्थ साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन निळ्या रंगाच्या प्रत्येकी 200 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये एकूण 600 लिटर मोहफुलाचे आंबवलेले, उग्र वासाचे फसफसयुक्त रसायन जप्त केले. या मुद्देमालाची किंमत सुमारे 36 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 103/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) व (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news