सट्टेबाज आरोपीस कुलूप बंद घरातून पकडले

Nanded crime | धर्माबाद व निजामाबाद पोलिसांची संयुक्त कारवाई हेडमास्टर व फंटर फरार
सट्टेबाज आरोपीस कुलूप बंद घरातून पकडले
Published on
Updated on

धर्माबाद : क्रिकेटमधील सट्टेबाजी प्रकरणात धर्माबाद व निजामाबाद पोलिसांची संयुक्त कारवाई करत कुलूप बंद घरात लपून बसलेल्या एका सट्टेबाजाला मंगळवारी फिल्मी स्टाईलने पकडले. सदर कारवाईसाठी पोलीस पथक सोमवारी दुपारपासून धर्माबादमध्ये तळ ठोकून होते. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी हेडमास्टरसह फंटर अद्यापही फरार आहेत.

धर्माबाद शहरातील क्रिकेटवरील सट्टेबाजीचे बिंग फुटल्याने मोठी खळबळ उडाली. काही दिवसापूर्वी अटक झालेल्या सचिन उत्तरवार यांनी सट्टेबाजीच्या रॅकेटमधील अनेक मोठ्या नावांचा पदाफाश केल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. त्यातच मनोज मानधनीचे नाव होते. यामध्ये मास्टर सुपर मास्टर तसेच स्थानिक पातळीवरील फंटर यांचा समावेश असल्याचे समजते. या खुलासामुळे धर्माबादसह परिसरातील सट्टेबाजीच्या जाळ्याला मोठा धक्का बसला आहे.

या प्रकरणातील आरोपी मनोज मानधनी राहणार धर्माबाद हा त्यांच्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार संयुक्त पथकाने त्यांच्या राहत्या घरी सोमवारी रात्री १२ वाजता पासून ते मंगळवारी सकाळी १२ पर्यंत निजामाबाद व धर्माबाद पोलिसांनी घरासमोर तळ ठोकला होता. मंगळवारी दुपारी पथकाने घराच्या गेटचे कुलूप तोडून मनोज मानधनी यास अटक केली. या अटकेनंतर संपूर्ण सट्टेबाजी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे. निजामाबाद उत्तर विभागाचे सर्कल इन्स्पेक्टर श्रीनिवास यांच्या पथकाने मानधनी याला निजामाबाद पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात पुढील कारवाईसाठी तेलंगणा पोलिसांनी विशेष पथके तयार केले असून फरार हेडमास्टर सह फंटरच्या शोधासाठी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

धर्माबादमधील अनेक सट्टेबाजांचे सरदार सध्या फरार झाले असून काहींना ठिकाण बदलण्याची माहिती समोर येत आहे. तेलंगणा पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि अचूक माहितीच्या आधारे धर्माबादमध्ये कारवाई करत सहआरोपीला अटक केली. आंतरराज्य समन्वय साधत त्याने सटेबाजीच्या मोठ्या जाळ्यावर प्रहार केला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार करून मोहीम राबवली जात असून गुन्हेगारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही असा संदेश पोलिसांनी दिला आहे.

काहीजण बाहेर प्रदेशात पळाले. गेल्यावर्षी अटकेपासून बचाव करण्यासाठी काही आरोपींनी श्रीलंका आणि नेपाळ येथे आश्रय घेतल्याची चर्चा होती प्रकरण थंड झाल्यानंतर ते पुन्हा धर्माबादमध्ये परतले होते. तर धर्माबाद शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेल्या एका पदाधिकाऱ्यांचाही या प्रकरणात समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलिसांची कडक भूमिका पाहता संबंधित आरोपी इतरत्र पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news