Nanded Accident | चिखली फाटा-सोनाळा मार्गावर भीषण अपघात; रक्षाबंधन साजरे करून घरी परतणाऱ्या महिलेचा मृत्यू

ऑटो रिक्षा-दुचाकीची जोरदार धडक; तीन जण गंभीर जखमी
Chikhali Phata Sonal Road Accident
Chikhali Phata Sonal Road Accident Pudhari
Published on
Updated on

Chikhali Phata Sonal Road Accident

किनवट : रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून प्रवास सुरू असताना चिखली फाटा-सोनाळा मार्गावरील दहेगावजवळ ऑटो रिक्षा आणि दुचाकीची शनिवारी (दि. २९) दुपारी दोनच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटो रिक्षातील ६० वर्षीय महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले.

मृत महिलेची ओळख नरपतीबाई बद्दूसिंग कत्त्तेलवार (वय ६०, रा. यमाईकुंटा, इंद्रावेल्ली, जि.आदिलाबाद.तेलंगणा) अशी झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनाळाकडून चिखलीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची दहेगावजवळ किनवटकडून येणाऱ्या ऑटो रिक्षासोबत धडक झाली. धडक जोरदार असल्याने ऑटोमधील नरपतबाई कटकवाल यांचा जागीच मृत्यू झाला.

Chikhali Phata Sonal Road Accident
Electricity Nanded News: घुंगराळ्यासाठी गावठाण सेपरेशनअंतर्गत १०० केव्हीचे पाच डीपी मंजूर

अपघातात जखमी झालेल्या तिघांना तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच पो.नि.गणेश कराड यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सिद्धार्थ वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दोन्ही वाहनांची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस तपासानंतर अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news