Nanded Crime | आमदापूर खुनाचा उलगडा: बेपत्ता व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पत्नीसह दोघांना अटक

गुन्ह्यात वापरलेला दगड, मृताचे कपडे व डीएनए नमुने जप्त
Missing Person Dead Amdapur Nanded
मृताच्या पत्नीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली Pudhari
Published on
Updated on

Missing Person Dead Amdapur Nanded

हणेगाव : मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता व्यक्तीच्या खुनाचा यशस्वी उलगडा करण्यात मरखेल पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकिशन गंगाधर गोलेवार (वय ५५ रा. आमदापूर) हे २५ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने १७ मे २०२६ रोजी मरखेल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला हे प्रकरण केवळ बेपत्ता व्यक्तीचे असल्याचे दिसत असले तरी तपासादरम्यान पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल, गुप्त माहिती आणि विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

Missing Person Dead Amdapur Nanded
Nanded Crime | पाटोदा परिसरात अवैध सागवान वाहतूक उघड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

सखोल चौकशीदरम्यान दैवशाला रामकिशन गोलेवार (वय ४०) व सुभाष व्यंकन्ना यत्तरवाड (वय ४५ ) यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली मिळाल्याचे सांगण्यात आले. आरोपींच्या सांगण्यावरून मृतदेह पुरलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला. उत्खनन करून मृतदेह बाहेर काढण्यात आला तसेच गुन्ह्यात वापरलेला दगड, मृताचे कपडे व डीएनए नमुने जप्त करण्यात आले.

या प्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news