दिवाळीसाठी मुंबई, पुणे विशेष रेल्वे धावणार; प्रवास होणार सुकर

दिवाळीसाठी मुंबई, पुणे विशेष रेल्वे धावणार; बाहेरगावी गेलेल्याचा प्रवास होणार सुकर
Nanded News
दिवाळीसाठी मुंबई, पुणे विशेष रेल्वे धावणार; प्रवास होणार सुकरfile photo
Published on
Updated on

नांदेड : मराठवाडयातून दिवाळीसाठी मोठ्याप्रमाणात लोक पुणे व मुंबई या औद्योगिक ठिकाणावरून दिवाळ सण साजरा करण्यासाठी रोजगारासाठी गेलेले स्थलांतरीत येतात.

दरम्यानच्या काळात खासगी वाहतुकदाराकडून मोठ्या भाडयाची आकारणी करण्यात येते. सहाजिकच लोकांचा पर्याय रेल्वेकडे वळतो. मराठवाडयातून सध्या मुंबईसाठी नांदेडवरून दैनंदिन पाच रेल्वे आहेत. तर, पुण्यासाठी दैनंदिन दोन रेल्वे आहेत. इतके रेल्वे असून देखील प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वेने प्रथमच करिमनगर-पुणे, नांदेड-पनवेल व करिमनगर-मुंबई या तीन रेल्वे मनमाडमार्गी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी दक्षिण मध्य रेल्वेकडून पत्रक काढण्यात आले आहेत.

पुणे-करिमनगर-पुणे (०१४५१/५२) ही साप्ताहिक रेल्वे आहे. पुणे-करिमनगर ही रेल्वे २१,२८ ऑक्टोंबर, ४ व ११ नोव्हेंबरला पुणे येथून रात्री १०.४५ वाजता निघेल तर, करिमनगर येथे तिस-या दिवशी पहाटे दोन वाजता पोहोचेल. परतीच्या काळात करिमनगर-पुणे ही रेल्वे २३,३० ऑक्टोंबर व ६, १३ नोव्हेंबरला करिमनगर येथून निघून पुणे येथे दुस-या सकाळी ९.४५ वाजता पोहोचल. या रेल्वेचे प्रत्येक चार फे-या होणार आहेत. तसेच नांदेड-पनवेल (०७६२५/२६) ही रेल्वे परभणी, जालना, छत्रपतीसंभाजीनगर, मनमाड, नाशिक मार्गे धावणार आहे.

नांदेड-पनवेल-नांदेड (०७६२५/२६) आठवडयातून दोन वेळेस धावणार आहे. नांदेड- पनवेल विशेष रेल्वे (०७६२५) ही २१ ऑक्टोंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत सोमवार व बुधवार अशी धावेल. नांदेड स्थानकावरून रात्री ११ वाजता निघून पनवेल येथे दुस-या दिवशी दुपारी १.३५ वाजता पोहचेल. तर, परतीच्या काळात पनवेल-नांदेड (०७६२६) ही रेल्वे २२ ऑक्टोंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत मंगळवार, गुरूवार धावेल. पनवेल स्थानकावरून दुपारी २.३० वाजता निघून नांदेड येथे दुस-या दिवशी सकाळी नांदेडला साडेचार वाजता पोहोचेल. या रेल्वेच्या प्रत्येकी १२ फे-या होणार आहेत.

याशिवाय करिमनगर-मुंबई-करिमनगर (०१०६७/६८) लोकमान्य टिळक टर्निन्स ही महिन्यातून एकदा धावणार आहे. ही रेल्वे २९ ऑक्टोंबर व ५ नोव्हेंबर मुंबईवरून करिमनगरसाठी सुटेल. तर, करिमनगर-मुंबई ही ३० ऑक्टोंबर व ६ नोव्हेंबर या दिवशी निघेल. या रेल्वेला एकुण लोकमान्य टिळक टर्निन्सवरून दुपारी साडेतीन वाजता सुटेल पुढे करिमनगरला दुस-या दिवशी साडे आठ वाजता पोहचेल. ही रेल्वे ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपतीसंभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड मार्गे करिमनगरला जाईल. या तीन विशेष रेल्वेमुळे काही प्रमाणात तरी, रेल्वेमधील गर्दीचा ताण कामी होईल, अशी अपेक्षा आहे.

Nanded News
पुणे-पिंपरी चिंचवड प्रवास होणार सुकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news