Snake awareness Nanded : सापांसह सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवदान देण्याची गरज

साप दिसून आल्यास नागरिकांनी परिसरातील सर्पमित्रांना संपर्क करावा
Snake awareness Nanded
Snake awareness Nandedpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. एकदा - दोनदा चांगला पाऊस झाल्यास जमिनीत खोल थंड ठिकाणी राहणारे विविध जातींचे साप व सरपटणारे प्राणी जमिनीबाहेर पडतात. त्यातून सर्पदंशांच्या अनेक घटना घडतात. अनेकांचे जीवही जातात. त्यामुळे अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्प दिसल्यास घाबरून न जाता, आपल्या परिसरातील सर्पमित्रांशी तातडीने संपर्क केल्यास सापालाही नक्कीच जीवदान मिळेल.

उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी साप व सरपटणारे प्राणी जमिनीत खोल ओलाव्याच्या थंड ठिकाणी राहतात. पण पावसाळ्यात दरी, फटी, भेगांसह बिळांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने साप जमिनीबाहेर पडतात आणि माणसांशी त्यांचा सामना होतो. त्यातूनच दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांची संख्या लक्षणीय असते. त्यातून जनावरांसह अनेकांना जीव गमवावा लागतो.

Snake awareness Nanded
Satara Accident: जिथे वाजणार होते सनईचौघडे तिथे निघाली अंत्ययात्रा

ही अप्रिय घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग व दक्ष राहिल्यास सर्पदंशांच्या घटना कमी होतील आणि सापांनाही जीवदान मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्या परिसरात एखादा नागराजा दिसल्यास घाबरून न जाता तातडीने आपापल्या परिसरातील सर्पमित्रांना संपर्क साधून माहिती देण्याची गरज आहे.

Snake awareness Nanded
Kolhapur Accident | कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर ट्रक-कारची भीषण धडक; साताऱ्याचे कदम कुटुंब अपघातात जखमी

निसर्गानिर्मित अन्नसाखळी जपण्याची गरज

निसर्गाची अन्नसाखळी विशिष्ट आहे. एकमेकांचे जीवन एकमेकांवर अवलंबून आहे. सापांचे अस्तित्व शेतकऱ्यांसाठी उपायकारक आहे. उंदराच्या उपद्वापाने शेतीमालाचे मोठे नुकसान होते. पण उंदीर सापांचे भक्ष्य असल्याने सापांमुळे शेतात उंदरांच्या संख्येवर मर्यादा येते. ही निसर्गाने दिलेली अन्नसाखळी जतन करण्याची गरज आहे.

सर्पमित्रांना मानधन देण्याची आवश्यकता

सर्पमित्रांमुळेच सापाचा जीव तर वाचतोच, पण माणसांचा देखील बचाव होतो. जीवावर उदार होऊन आम्ही विषारी सापांना ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षित स्थळी त्यांना सोडून दिले जाते. त्यांचे हे कार्य जीवावर बेतणारे असल्याने या सर्पमित्रांना शासनाकडून मानधन मिळावे, अशी अपेक्षा शहरातील अनेक सर्पमित्रांकडून व्यक्त होत आहे.

शोधा आपापल्या भागातील सर्पमित्र

प्रसाद शिंदे (छत्रपती चौक) 9011307854, गणेश भोसले (शहर) 9545324115, प्रसाद सोनकांबळे (चैतन्यनगर) 7875175302, संजय अडगुलवार (अबचलनगर) 9763123485, हरविंदर सुखमनी (गुरुद्वारा परिसर) 9422871771, राजूसिंग (नवीन कौठा) 8605597678, उमाकांत गोडबोले (रहिमपूर, वसरणी) 8793049358, अजिम पठाण (वसरणी, नवाघाट) 9604414515, अक्षय येरनाळे (नंदीग्राम सोसायटी) 8898470930, उडगिरे (असर्जन परिसर) 9767214389, संघा पाईकराव (तरोडा नाका) 7709977667, संतोष गिरी (मालेगाव रोड) 7517920304,बॉबी ढोले (डीमार्ट परिसर) 8378821240, अमर कुंडराज (भाग्यनगर) 8888578959, शिवम आर्या (गोवर्धनघाट) 9370417950, विक्रम सारंग (विष्णुपुरी) 8788729935, मनोज मोगले (मालेगाव रोड) 7499337463, विठ्ठल (म्हाडा कॉलनी) 8999757802, शंकर (सिडको) 9970262206,प्रसाद शेंडे (हडको) 9011307854.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news