

कुंडलवाडी, पुढारी वृत्तसेवा : कुंडलवाडी येथील माचनुर रोड लगत असलेल्या एका आश्रम शाळेचे अध्यक्षाने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. शाळेच्या अंगणात व बाथरूम जवळ येऊन वाईट हेतूने मुलीचा डावा हात पकडून 'तू मला खूप आवडतेस' , आय लव यू, 'तू माझ्यासोबत चल', आपण कार मध्ये बसू' असे म्हणून विनयभंग केला. ही घटना दि.९ ते दि.११ एप्रिलदरम्यान घडली. (Nanded Abuse Case)
या प्रकरणी गजानन राजरवाड (वय ४०, रा. संत गोरोबा प्राथमिक आश्रम शाळा कुंडलवाडी, मूळ रा.सिडको, नांदेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन पीडित मुलगी मैत्रिणी सोबत झोपलेली संधी साधून आरोपीने तिचा डावा हात पकडून तिच्या शरीराशी छेडछाड केली. याबाबत अल्पवयीन मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितले. या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.१८) पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबाद उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या.