नांदेड: कंधार येथे भक्ती मेडिकलला भीषण आग; ५० लाखांचे नुकसान

कंधार येथे भीषण आगीत भस्मसात झालेले भक्ती मेडिकल
कंधार येथे भीषण आगीत भस्मसात झालेले भक्ती मेडिकल
Published on
Updated on

कंधार, पुढारी वृत्तसेवा : कंधार येथील  भवानीनगर कमानीसमोर असलेल्या भक्ती मेडिकल दुकानाला आज  (दि.२) सकाळी आठच्या  दरम्यान भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल पावणे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत मेडिकलमधील सुमारे ५० लाखांची औषधे आणि सामान जळून खाक झाले.

भवानी नगर कमानी समोर अमोल यदुराज गबाळे यांचे रिटेल तर आशिष संजय गबाळे यांचे होलसेल असे दोन्ही मेडीकल स्टोअर्स एकाच ठिकाणी दोन मजली इमारतीत आहेत. उजव्या बाजूला असलेल्या  ऐश्वर्या साडी सेंटरचेही आगीत नुकसान झाले आहे. सकाळी  इनव्हर्टरची बॅटरी किंवा फ्रिजच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली असावी, अशी माहिती अमोल गबाळे यांनी दिली.

घटनास्थळी भक्ती मेडिकलचे अमोल उबाळे आल्यानंतर पाण्याचे खासगी टॅंकरच्या सहाय्याने आग विझविली. एक तासानंतर आलेल्या नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने वरच्या मजल्यावरील आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू, आग आटोक्यात आली नाही. शेवटी लोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण मिळविले.  आग विझविण्यात पोलिस दलानेही महत्वाची भूमिका बजावली.

कंधार नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा कुचकामी

आग लागलेल्या ठिकाणापासून नगरपरिषद कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. परंतु अग्निशमन दल वेळेत पोहोचले नाही. जमावाने खासगी टॅंकरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येऊ शकली नाही. तब्बल एक तासानंतर कंधार पालिकेचे  अग्निशमन दल दाखल झाले. आग विझविणाऱ्या पाईपमधून अर्धे पाणी वाया जात असल्याने आग विझविण्यासाठी पाण्याचे आवश्यक प्रेशर नव्हते. पोलीस दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न  केला. अखेर लोहा  पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. तब्बल पावणे दोन तासानंतर आग आटोक्यात आली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news