Manoj Jarange appeals for support to Shinde family | शिंदे कुटुंबाला मायेचा आधार द्या ! मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे आवाहन

शिंदे कुटुंबाला मायेचा आधार द्या ! मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे आवाहन
Shinde family
Shinde family
Published on: 
Updated on: 

नांदेड - माळकौठा ता. मुदखेड येथील शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा सक्तीच्या कर्ज वसुलीत नाहक बळी गेल्यानंतर या कुटुंबाच्या घरी सोमवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भेट दिली. यावेळी पीडित शिंदे कुटुंबाच्या पाठीशी मुलाप्रमाणे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देत कुटुंबास धीर दिला. या कुटुंबाच्या वर्तमान व भविष्यकाळातील वाटचालीसाठी ग्रामस्थांनी मायेचा आधार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिंदे कुटुंबाच्या भेटीदरम्यान या प्रकरणातील एसआयटी चौकशीसंदर्भात जरांगे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यांनतर त्यांनी गावच्या हनुमान मंदिरातून ग्रामस्थांना संबोधित करीत मृत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांच्या मागणीनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती दिली.

तसेच या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची, नोकरीची जबाबदारी माजी मंत्री आ.तानाजी सावंत यांच्यावर सोपविल्याची बाब जरांगे यांनी स्पष्ट केली. कुटुंबाचा वर्तमान उदरनिर्वाह सुरू राहावा, यासाठी पीडित कुटुंबातील महिलेस तात्काळ नोकरी देण्यासंदर्भात खा. अशोक चव्हाण यांना साकडे घालण्यात आल्याची बाब समोर आली. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या एका भेटीने पीडित शिंदे कुटुंबाला मोठा आधार मिळाल्याची चर्चा ग्रामस्थांत होत होती.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी गावातील तरुणांना दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. आई-वडील आयुष्यभर कष्ट करून मुलांना मोठे करतात. त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याऐवजी दारूच्या आहारी जाऊन कुटुंबाचे नुकसान करू नका, शिक्षण शिका, व्यवसाय करा, नोकरी मिळवा आणि आई-वडिलांचा आधार बना, असा संदेश त्यांनी यावेळी माळकौठा येतील तरुणांना दिला.

एका कुटुंबाचा बाप गेला आहे. हे दुःख कधीही भरून निघणार ● नाही. करण-उत्सवात घराघरांमध्ये आनंद असतो. यंदा या पीडित घरातील लेकरांना वडिलांची आठवण येऊन अश्रू अनावर होतील, त्यामुळे ग्रामस्थांनो आज भेट देऊन थांबू नका. सातत्याने या कुटुंबाची विचारपूस करा आणि मायेचा आधार द्या.

- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.