Nanded News : व्हीआयपी दर्शनाचा माज..! माहूरगडावर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा...!

"तासभर रस्ता अडवून आमदाराचा ताफा; संतप्त भाविकांनी वाहनाच्या काचा फोडल्या..!"
Mahurgad Navratri VIP Darshan Controversy
Mahurgad Navratri VIP Darshan Controversypudhari photo
Published on: 
Updated on: 

वाई बाजार: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडावर नवरात्रोत्सवाच्या गर्दीत व्हीआयपी दर्शनाचा विषय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, एकीकडे सामान्य भाविक तासनतास रांगेत उभे राहून दर्शनाची प्रतीक्षा करताना दुसरीकडे व्हीआयपींच्या वाहनताफ्यांमुळे सार्वजनिक रस्ते अडवले जात असल्याचा संतापजनक प्रकार आज दि. १९ रोजी समोर आला. तेलंगणातील एका आमदारासह महाराजांच्या ताफ्यातील सुमारे सात वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचा आरोप असून, या प्रकाराने संतप्त झालेल्या एका भाविकाने संबंधित आमदाराच्या वाहनाची चक्क काच फोडल्याची घटना घडल्याने माहूरगडावरील वाहतूक नियोजन आणि व्हीआयपींना दिल्या जाणाऱ्या कथित झुकत्या मापाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आज दि.१९ रोजी माहूर गडावरील श्री रेणुकादेवी गडाच्या पायथ्याशी एक वेगळाच प्रकार घडला असून व्हीआयपींच्या दर्शनासाठी चक्का रस्ताच ओलीस असल्याचा प्रत्यय सामान्य भाविकांना आला. तथापि, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यांतून हजारो भाविक माहूरगडावर दाखल होत असतात, अशा गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना, व्हीआयपींच्या वाहनांमुळेच रस्त्यावर अडथळे निर्माण होत असतील, तर वाहतूक नियोजन नेमके कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

Mahurgad Navratri VIP Darshan Controversy
Nanded Farmer Loan Waiver : जिल्ह्यातील १ लाख २ हजार २१८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

आज १९ ऑक्टोबर रोजी तेलंगणातील एका आमदारासह एका महाराजांच्या ताफ्यातील सुमारे सात वाहने माहूरच्या श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी गडावर आली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ताफ्यातील एका वाहनाने रस्त्याच्या मधोमध ठाण मांडल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपात निर्माण झाला. त्यावेळी आमदार महोदय दर्शनासाठी गेले होते. मात्र त्यांचे वाहन 'जैसे थे' च होते. अशावेळी त्यांच्या वाहनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यात अडकलेल्या सामान्य भाविकांबरोबरच महाराष्ट्र राज्य महामंडळाची एसटी बसही तब्बल तासभर अडकली.

केवळ व्हिआयपींच्या वाहनताफ्यामुळे ऐन गर्दीच्या काळात वाहतूक ठप्प झाल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा संताप अनावर झाला.. त्याहीपेक्षा तब्बल तासभराहून अधिक काळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नवरात्रोत्सवातील गर्दी, उष्ण वातावरण आणि त्यात भर म्हणून वाहतूक कोंडी..! अशा परिस्थितीत श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शनापूर्वीच या गैरसोयीचा सामना करावा लागल्यामुळे व्हीआयपींच्या सोयीसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार भाविकांना अत्यंत वेदनादायी ठरला असून या प्रकाराला जबाबदार कोण..? असा संतप्त सवाल उपस्थित करताना संतप्त झालेल्या एका भाविकाने संबंधित आमदाराच्या वाहनाची चक्क काचच फोडल्याची घटना घडली.

Mahurgad Navratri VIP Darshan Controversy
Jalna Accident : शेगाव-पंढरपूर महामार्गावर बस-दुचाकीची धडक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news