

लोहा : लोहा शहरातील देऊळ गल्ली भागातील वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात १० सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी मंदिराच्या कुलुपाचे तोडून दानपेटी फोडली आणि त्यामध्ये ठेवलेली दोन किलो चांदीची दागिने आणि ३५ हजार रुपये नगद लंपास केली. चोरीची एकूण किंमत सुमारे ४४ हजार रुपये आहे.
सदर घटनेची तक्रार जैन मंदिराचे विश्वस्तांनी लोहा पोलिसांत केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लोहा शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवकल्याण नगर भागातील नूतन वसाहतीतून एक मोटारसायकल चोरीला गेली होती. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता जैन मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी कपाट आणि दानपेटी फोडून अंदाजे ५० हजार रुपये नगदी आणि २ किलो चांदीची दागिने लंपास केली.
सदर घटना कळताच जैन समाजातील नागरिक मंदिराच्या परिसरात जमा झाले. लोहा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि श्वान पथकाने चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. याच रात्री लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे देखील चोरीची घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, लातूर स्थागुशाचे पथक लोह्यात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून गेले. सदर घटनेप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जैन समाजात या चोरीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.