

संघपाल वाघमारे
कंधार: नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ५ उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) एकुण १० नगरसेवक निवडून आले. अपक्ष ०३ उमेदवार तर शिवसेना शिंदे गट ०१, वंचित बहुजन आगाडी ०१ उमेदवारांनाही यश मिळाले.मात्र केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.
कंधार नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली होती. ह्या पदासाठी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटांमध्ये तुल्यबळ लढत होऊन नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे शहाजी नळगे याना ८७६० एकुण मते मिळाली. ते २३४९ मताची आघाडी घेवून विजयी झाले. ते निवडून आल्याचे जाहीर होताच त्याच्या समर्थकांनी फटाक्याची अताशबाजी करुन विजय साजरा केला. त्यांचेच प्रतीस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गटाचे) हणमंत उर्फ स्वप्नील लुगारे याना ६४११ मते मिळाली.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे व त्यांना मिळालेली मते अशी आहेत.
प्रभाग १ - अ मधून बसवंते वैशाली दिलीप ५९६ मत मिळाली. १-ब मधून नळदकर मयूर विजय ६७७ सेवा जनशक्ती पार्टी मत घेवून विजयी झाले. २-अ मधून पवार सुनिता दिलीप १२६४ काँग्रेस, २- ब मधून देशमुख दिलीप संतराम वंचित बहुजन आघाडी, ३ - अ मधून अब्दुल मन्नान म. सरवर १०७९ काँग्रेस पार्टी, ३-ब मधून शेख वैसरबेगम इस्माइल ९२६ मते कॉग्रेस, ४ - अ मधून बनसोडे देऊबाई रामराव काँग्रेस ८५६ मते मिळाली. ४-ब मधून नळगे भास्कर अरविंदराव काँग्रेस १००४ मतांनी विजयी, ५ - अ म. समिरउल्ला अमिरउल्ला नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ९५७ मतानी विजयी, ५-ब परवीन तबस्सुम मोहम्मद जफरोद्दिन नॅशनलिस्ट काँग्रेस ९१९ मते मिळाली. ६ - अ मधून कदम प्रकाश भगवानराव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी १३८१ मते घेवून वीजयी, ६-ब मधून पठाण परविन बेगम रेहमत उल्ला खान ११८० मते घेवून विजयी नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी , ७ - अ मधून कांबळे कविता कैलास नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ८९७ मते घेवून विजयी, ७-ब मधून मोहम्मद जफरोद्दिन मोहम्मद वाहोद्दिन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ६२५ मते घेवून विजयी, ८ - अ मधून कांबळे कुसुम उर्फ मेघा सुहास अपक्ष - ६४६ मते घेवून विजयी ८ - ब मधून कांबळे सुधाकर मरीबा भारतीय काँग्रेस ७२१ मते घेवून विजयी, ९- अ मधून सोनकांबळे राजु दगडु अपक्ष - ६४६, ९ - ब मधून शेख अजमेरी अब्दुल नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी - ८८२ मते घेवून विजयी, १० - अ मधून केंद्रे अनुराधा चेतन नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी- ४१८ मते घेवून विजयी, १० - ब मधून शिवसेना शिंदे गट - ३९४ मते घेवून विजयी झाले.
कंधार नगरपालिका निवडणुकीतील मतमोजणीला रविवारी सकाळी १० वाजता प्रत्यक्षात सुरुवात झाली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईलवर बंदी घालण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.