इसापुर धरण ७५ टक्के भरले; नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Nanded Isapur dam flood warning: पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरू शकते. त्यामुळे पेनगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांमध्ये प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
Isapur dam flood warning
Isapur dam flood warningPudhari Photo
Published on
Updated on

उमरखेड : पेनगंगा प्रकल्पातील इसापुर धरणात ७५ टक्के पाणीसाठा झाल्याने नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पेनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक १, पेनगंगा (ता. पुसद, जि. यवतमाळ) कार्यालयाकडून यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.

धरणातील पाणीसाठा वाढतोय

इसापुर धरणात आज (दि.२८) सकाळी ८ वाजेपर्यंत ७२५.६८८ दशलक्ष घनमीटर (७५.२७%) पाणीसाठा नोंदवला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरू शकते. त्यामुळे पेनगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांमध्ये प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. हा केवळ प्राथमिक इशारा असून, पुढील निर्णय पावसाच्या स्थितीनुसार घेतले जातील, असे अधीक्षक अभियंता एस. डी. खडके यांनी स्पष्ट केले आहे.

पाणी विसर्गाची शक्यता

धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून, पुढील काही दिवसांत पाणी विसर्गाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, ३१ जुलै २०२५ पर्यंत धरण ९१.४३ टक्के (८८४.१२ दशलक्ष घनमीटर) भरू शकते. पावसाचा जोर आणि नदीत येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदिकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास, तात्काळ माहिती संबंधित ग्रामपंचायत, पोलीस, महसूल व इतर यंत्रणांमार्फत कळविण्यात येईल. तसेच, व्हॉट्सअॅप गटांद्वारेही सूचना दिल्या जातील.

सतर्कतेचे उपाय:

  • नदिकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी.

  • प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

  • अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूत्रांमार्फत मिळणाऱ्या सूचनांना प्रतिसाद द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news