

हिमायतनगर : नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह ८ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या निकालाने भाजपच्या बड्या नेत्यांसह शिंदे गटाचे विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभा घेऊन मोठी ताकद लावली होती, तर शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी चक्क दोन मंत्र्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या. मात्र, मतदारांनी विकासकामांवर विश्वास ठेवत पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवल्या आहेत.
थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडीत काँग्रेसचे शेख रफिक शेख महेबुब यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचंड मताधिक्याने पराभव करत विजय मिळवला.
पक्ष विजयी नगरसेवक संख्या काँग्रेस-०८ (बहुमत), भाजप०३, शिवसेना (ठाकरे गट)०३, शिवसेना (शिंदे गट)०२, राष्ट्रवादी (शरद पवार गट)०१, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
वॉर्ड २: विनोद गुंडेवार
वॉर्ड ३: अब्दुल कंजुल फिरदौस हक्क
वॉर्ड ४: सौ. कमल मेंडके
वॉर्ड ५: हसिना बेगम अब्दुल्ल सलाम
वॉर्ड ७: सौ. दर्शना पंडीत
वॉर्ड १४: म. मुजतबा मतीन
वॉर्ड १५: शेख सलमा बी इलियास
वॉर्ड १६: सलमा खानम समदखान
भाजप: सौ. दर्शना शरद चायल (वॉर्ड १), आशिष सकवान (वॉर्ड १०), भारत डाके (वॉर्ड ११).
शिवसेना (ठाकरे गट): मिरझा जिशान बेग (वॉर्ड ८), सौ. सुचीता कुणाल राठोड (वॉर्ड ९), विठ्ठल भिमराव ठाकरे (वॉर्ड १२).
शिवसेना (शिंदे गट): सुभाष बलपेलवाड (वॉर्ड १७), सौ. अरूणा भगवान मुद्देवाड (वॉर्ड ६).
राष्ट्रवादी (शरद पवार गट): सरदार खान खलील खान पठाण (वॉर्ड १३).