ASHA Workers New Posts Approved | हिमायतनगर तालुक्यासाठी 42 नवीन आशा स्वयंसेविका पदे मंजूर

Jawalgaonkar ASHA Efforts | माजी आ.जवळगावकरांच्या पाठपुराव्याला यश
ASHA Workers New Posts Approved
माधवराव पाटील जवळगावकर(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Himayatnagar ASHA Workers

हिमायतनगर : लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आशा स्वयंसेविकेची पदे पुरेशी नसून २०११ च्या जणगनेनुसार लोकसंख्ने च्या प्रमाणात आशा स्वयंसेविकेची पदांना मान्यता देऊन ती पदे भरावीत अशो मागणी राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याकडे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. तत्कालीन आ.जवळगावकर यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून हिमायतनगर तालुक्यासाठी 42 नवीन वाढीव पदांना मान्यता देण्यात आली आहे.

हिमायतनगर तालुक्यात आशा वर्कर स्वयंसेविकाची एकुण 61 ची मंजूरी असुन सद्यस्थिती 56 कार्यरत आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम मध्ये 33 व चिचोर्डी मध्ये 23 कार्यरत आहेत. तर उर्वरित गावांमध्ये अशा वर्कर च्या जागा रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळगावकरांकडे सदरील प्रश्न मांडला होता.त्यांनतर जवळगावकर यांनी सोबत २०11 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आशा वर्कर ची पदे मंजूर करण्याची मागणी एका पत्राद्वारे आरोग्यमंत्र्याकडे केली होती.

ASHA Workers New Posts Approved
नांदेड: नायगाव, हिमायतनगर तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

या मागणीला व माजी माधवराव पाटील आ.जवळगावकर यांच्या पाठ पुराव्याला यश प्राप्त झाले आहे. तत्कालीन आ.जवळगावकर यांनी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कामाकडे लक्ष देऊन आदिवासी बहुल भागातील नागरिकांनासाठी चिचोर्डी येते भव्य आरोग्य केंद्राची इमारत उभी केली आज या इमारतीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना आधार मिळत आहे.

ASHA Workers New Posts Approved
Nanded News : भक्तांच्या नवसाला पावणारा फुलवळ येथील महादेव

जवळगावकरांच्या प्रयत्नांमुळे हिमायतनगर तालुक्यात नवीन 42 पदांना मंजुरी मिळाल्याने आरोग्य विभागावरील तान कमी होऊन निवड झालेल्या गावांमध्ये आशा वर्कर मार्फत लशीकरण, महिलांच्या प्रसृती, प्रत्येक उपकेंद्रा अंतर्गत नागरीकांना वेगवेगळ्या आरोग्य विषयक माहिती मिळेल घरोघरी रुग्णांना औषधी मिळणार आहे.या नवीन मंजुर झालेल्या अशा वर्कर करीता आरोग्य विभागाकडून लवकरच भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news