Hadgaon illegal sand mining| हदगाव तालुक्यात अवैध रेती व मुरुम माफियांना सुगीचे दिवस, स्थानिक महसुल प्रशासन घेतंय झोपेचे सोंग

प्रशासनाला या विषयाची इंत्यंभूत माहिती असेलच अशा शंका-कुशंकेची ग्रामस्थात चर्चा
illegal sand mining
illegal sand mining
Published on
Updated on

हदगाव : मागील अनेक दिवसापासुन तालुक्यातील विविध ठिकाणी मुरुम माफियांने मुरुम उपसा जोरात चालु असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. याकडे मात्र स्थानिक तलाठी, मंडळधिकारी हे झोपेचे सोंग घेत आहेत

हदगाव तहसिल कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या नंदी पात्राच्या जवळ असणारे गाव यामध्ये, गोर्लेगाव, भानेगाव, पिंपळखेड, चिचोली, बाभळी, गुरफळी, कोथळा, हरडफ, वाटेगाव, धोतरा, वाळकी, लिंगापुर, टाकळा, शिवणी या शिवाराच्या नदी पेंढावर अवैध रेतीचे नियमबाह्य रेती उत्खन करून रेती उचल करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पण संबंधित प्रशासनाच्या ढिलाईमुळे रेती माफियावर फारसा कुठलाही वचक राहिला नसल्यामुळे जणूकाही रेती माफियांना हदगाव महसुल विभागाचे अधिकारी त्यांना सहकार्य करत असल्याची भुमीका ही ग्रामीण भागातील नागरिकामध्ये एकमेकात होत असलेल्या चर्चेत ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच हदगाव तालुक्यात रेती माफियाला आता सुगीचे दिवस आल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

शहरात व ग्रामीण भागासह या रेती चोरानी संबंधित हदगाव महसुल प्रशासनातील अधिकार्‍यांना हाताशी धरुन महसुल विभागाला लाखो रुपयांचा चूना लावत एका प्रकारे शासनाचा महसुल प्रशासनाला फटका बसत आहे. एवढेच नाही तर अवैध रेती वाहतुकीच्या गाड्यांनी ग्रामीण क्षेत्रातील रस्त्याची दुर्दशा झाली.परंतू अशा गंभीर विषयाकडे संबंधित प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे. अशा रेती माफियांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले दिसून येते. विशेष म्हणजे हदगाव तालुक्यातील आन्य गावात अनेक जण अवैध रेती व्यवसायातून ट्रॅक्टर चालक-मालकही बनले असून भरपुर प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. त्यामुळे या व्यवसायातून अनेक जन लखोपती झाले. संबंधित प्रशासनाला या विषयाची इंत्यंभूत माहिती असेलच अशा शंका-कुशंकेची ग्रामस्थात चर्चा होत असतांना ऐकायला मिळत आहे.

अवैध गौण खनिज माफियांचा हदगाव शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ... महसूल खाते तसेच पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे अवैध मुरुम माफिया कोणालाही अजिबात न जुमानता हदगाव शहर व तालुका परिसरात अवैध गौण खनिज माफियांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. या माफियांकडून विशेषतः सुट्टीच्या दिवसात अवैध खनिज उत्खन्न व वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून गौण खनिज माफिया किती मुजोर झाले आहेत,यावर स्पष्ट दिसुन येथ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news