Gutkha Seized : लाखाचा गुटखा जप्त, एका तरुणाला अटक

राज्यात प्रतिबंधित असलेला आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारा पान मसाला व गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका इसमास भोकर पोलिसांनी रंगेहात पकडले.
Gutkha Seized
Gutkha Seized : लाखाचा गुटखा जप्त, एका तरुणाला अटकPudhari Photo
Published on
Updated on

Gutkha Worth Lakhs Seized; One Youth Arrested

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : राज्यात प्रतिबंधित असलेला आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारा पान मसाला व गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका इसमास भोकर पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Gutkha Seized
Hingoli crime | सेनगाव पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाख ३० हजारांचा अवैध गुटखा जप्त

बटाळा चौक ते म्हैसा बायपास दरम्यान एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले व त्याच्या कडून (क्र. एम एच २६ बी बी ८३२०) जप्त केली.

त्याच्या दुचाकीवरील नायलॉनच्या पोत्याची झडती घेतली असता, त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला फिरोझा पान मसाला आणि ए ए नावाचा गुटखा मिळून आला. असा एकुण एक लाख ७ हजार ५५० रुपये जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून खान मुझफर खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gutkha Seized
Beed Crime News | अंबाजोगाईत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 'तिर्रट' जुगाराचा डाव उधळला, ६ जणांना अटक

गुटखा तेलंगणा राज्यातील निर्मल येथील एका एस. एल. जर्दा दुकानाच्या मालकाकडून आणला जात होता. पोलीस आता त्या दुकानाच्या मालकाचा शोध घेत आहेत, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news