Graduate Constituency Election 2026 : शरद पवारांचा एक कॉल... फिरला निकाल !

थोरल्या पवारांनी अनेक शिक्षण संस्थाचालकांशी थेट संपर्क साधल्यामुळे त्याचा मोठा परिणाम झाला अन् त्यांच्या पक्षाचे मराठवाड्यातून विधान परिषदेमध्ये खातेही उघडले !
Graduate Constituency Election 2026
Graduate Constituency Election 2026 : शरद पवारांचा एक कॉल... फिरला निकाल !file phopto
Published on: 
Updated on: 

Graduate Constituency Election 2026: Sharad Pawar's One Call... Result Turned!

संजीव कुळकर्णी

नांदेड : '... नमस्कार, मी शरद पवार' अशी सुरुवात करून थेट विषयाकडे. संदर्भ होता मराठवाडचातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांना सहकार्य करण्याचा, थोरल्या पवारांनी अनेक शिक्षण संस्थाचालकांशी थेट संपर्क साधल्यामुळे त्याचा मोठा परिणाम झाला अन् त्यांच्या पक्षाचे मराठवाड्यातून विधान परिषदेमध्ये खातेही उघडले !

Graduate Constituency Election 2026
Nanded Women Farmers Registration : महिला शेतकरी नोंदणीत किनवट जिल्ह्यात अव्वल

तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी फूट पडल्यानंतर या पक्षाचे मराठवाड्यातील सतीश चव्हाण आणि विक्रम वसंत काळे हे दोन्ही विधान परिषद सदस्य अजित पवार यांच्यासोबत गेले. विधानसभेतील बहुतांश आमदारही तिकडेच दाखल झाले होते. पुढे सव्वा वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत थोरल्या पवारांच्या पक्षाला या विभागातून केवळ एक जागा मिळाली; पण वरच्या सभागृहात त्यांचा एकही सदस्य नव्हता.

औरंगाबाद विभाग पद‌वीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शरद पवारांच्या पक्षाची प्राथमिक तयारी काहीच नव्हती, तरी पक्षातील काही नेत्यांनी पक्षाध्यक्षांकडे प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचे नाव शिक्कामोर्तब झाल्यानंतर उमेदवारांच्या अंतिम यादीतून पाटील यांचे नाव समोर आले. तोवर धाराशिव व परभणीच्या बाहेर त्यांची व्यापक ओळखही नव्हती.

सुचविले. त्यावर चर्चा होऊन एज निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर महायुतीचे उमेद्वार सतीश चव्हाण यांचाच बोलबाला दिसत होता. त्यांच्या चौथ्या विजयाचा दावाही केला गेला. त्यांच्या प्रभावी यंत्रणेसमोर इतर उमेदवार 'मामूली' वाटत होते. पण प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी ठिकठिकाणी अदृश्य हात कार्यरत असल्याची किंवा झाल्याची बाब भल्याभल्यांच्याही लक्षात आली नाही.

Graduate Constituency Election 2026
Ashok Chavan Birthday : दुष्काळाचे कारण... मुखपत्रात जाहिरातींचे ‘तोरण!’

ती आता निकालानंतर समोर येत आहे निवडणुकीच्या मतदानापूर्वी शरद पवारांनी मराठवाड्यातील आपल्या जुन्या विश्वासू सहकाऱ्यांसह ठिकठिकाणच्या परिचित अपरिचित संस्थाचालकांशी दुरध्वनीवरून संपर्क साधला. प्रत्येकाशी ते मोजकेच; पण नेमके बोलल्यामुळे अनेक संस्थाचालक प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे. खा. पवार यांनी नांदेड जिल्हह्यातील कमलकिशोर कदम, डॉ. माधव किन्हाळकर या आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क साधलाच; पण दिवंगत केशवराव धोंडगेंच्या दोन्ही मुलांना ते आपल्या उमेद‌वारासाठी बोलले.

विभागातील इतर अनेक संस्थाचालकांशी थेट संवाद साधून पवारांनी त्यांच्याकडील मतदारांना प्रतापसिंह पाटील यांच्या बाजूने वळविल्याचे आता सांगितले जात आहे. परमणीच्या विजय गव्हाणे तसेच नांदेडमधील गजानन पोपटवार यांनी या माहितीस दुजोरा दिला, सुप्रिया सुळेंचाही फोन आला होता, असे मुक्तेश्वर धौडगे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यात भाजपातील अशोक चव्हाण व त्यांचे समर्थक पक्षादेशानुसार सतीश चव्हाण यांच्या बाजूने दिसले, फिरले; पण या पक्षाच्या एका आमदाराने मात्र प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी बराच जोर लावला, असे समोर आले आहे. शरद पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना आपल्या पक्षाची उमेदवारी देत निवडून आणण्याचाही प्रयत्न केला; पण पराभव झाल्यानंतर या पक्षासोबत कायम न राहता ते पुन्हा अजित पवारांच्या गटामध्ये गेले, ही बाब शरद पवारांच्या समर्थकांना खटकली होती. त्यातील अनेकांनी आता चव्हाणांचा पराभव करण्यात हातभार लावल्याचे सांगितले जात आहे. पवारांचा एक कॉल... अन् फिरला निकाल, असे या पक्षाच्या विजयाचे येथे वर्णन केले जात आहे.

पदवीधर' च्या निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाल्यानंतर नांदेड शहर व जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. समाजमाध्यमांमध्ये 'खा. शरदचंद्र पवारांचा हाबाडा' या मथळ्याखालील पोस्टमध्ये घरून चक्र फिरवणारा एकमेव नेता, असे त्यांचे वर्णन करण्यात आले. काँग्रेसच्या संदीपकुमार देशमुख बारडकर व अनेक कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.