Nanded News : महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसाद

शहरासह ग्रामीण भागातही कडकडीत बंद, कडक पोलिस बंदोबस्त
Nanded News
Nanded News : महाराष्ट्र बंदला नांदेडमध्ये चांगला प्रतिसादfile photo
Published on
Updated on

Good response to the 'Maharashtra Bandh' in Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गुरुवारी नांदेड शहरासह जिल्हाभरात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी अनुयायी बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Nanded News
Nanded News | नायगाव रुग्णालयात हेडलाईटच्या उजेडात शवविच्छेदन; आमदार राजेश पवारांकडून गंभीर दखल

महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला गुरुवारी सुरुवात होणार असल्याने सकाळी दहा वाजल्यापासूनच विविध संघटनांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा निघाला. हा मोर्चा महात्मा फुले पुतळा मार्गे कलामंदिर, एसपी ऑफिस चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात तरुण-तरुणींसह महिला आणि आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलन काळात कुठलीही अनुचित घटना घड नये, यासाठी पोलिस अधीक्षक निलभ रोहन यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

ग्रामीण भागातही शांततापूर्ण बंद

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या बंदच्या आवाहनाला ग्रामीण भागातही मोठा प्रतिसाद मिळाला. नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शांततापूर्ण बंद पाळण्यात आला. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शांततेत मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनात भन्ते परय्याोधी, डॉ. विठ्ठल पावडे, नगरसेवक मुन्ना अब्बास, प्रशांत इंगोले, अ. गफ्फार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Nanded News
Bogus Seeds : बोगस सोयाबीन बियाणे विक्री

शहरातील बाजारपेठ बंद

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आदल्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी शहरातील बाजारपेठ बंद दिसून आली. शहरातील शिवाजीनगर ते वर्कशॉप परिसरातील दुकाने सकाळपासूनच बंद होती, तर दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोर्चा निघाल्यानंतर उर्वरित भागातील दुकाने, अस्थापना पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news