Gold Theft News | एसटीतील दागिने चोरी प्रकरणाचा २ तासांत निकाल; पोफाळी पोलिसांच्या तत्परतेने चोरट्या महिला गजाआड

Gold Theft
Gold Theft
Published on
Updated on

​उमरखेड : प्रवासादरम्यान बसमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाच, तालुक्यातील पोफाळी पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवित चोरीचा गुन्हा अवघ्या २ तासांत उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी २,लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Gold Theft News in nanded
Gold Theft News in nanded

​याबाबत, पोफाळी पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार, २६ फेब्रुवारी रोजी पुसद येथील रहिवासी सौ. सविता शालीग्राम गडवे या शेगाव-उमरखेड बसने पुसद ते पोफाळी असा प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या बॅगेतील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची 'गहू मणी' पोत (किंमत २,१०,००० रुपये) अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोफाळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोफाळी पोलीस व उमरखेड वाहतूक शाखेच्या पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी संबंधित बसचा पाठलाग करून तिला बेलखेड फाट्या जवळ अडवले. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने बसमधील संशयास्पद महिलांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यांची झडती घेतली असता, या महिलांकडे चोरीला गेलेली सोन्याची पोत मिळून आली. आरोपी महिलांनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी

पोफाळीचे ठाणेदार निलेश शेंबडे, वाहतुक शाखेचे अमोल गुंडे सुरेश शिंदे, उपनिरीक्षक,​शिवाजी पवार, हिंमत बंडगर, पवन चंदेवाड, शिवाजी चंद्रवंशी, सिमा इंगळे, निलम श्रीवास आणि चालक फिरोज काझी व नागेश वास्तर. यानी कामगिरी बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी पवार करत आहेत. पोलिसांच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news