झरी येथील खदानीत बुडून चार तरुणांचा मृत्यू

शहरालगत असलेल्या झरी (ता.लोहा) येथील खदानीच्या पाण्यात बुडून ४ युवकांचा मृत्यू
Four youths died after drowning in the quarry
खदानीमध्ये बुडून चार तरुणांचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

सोनखेड : पुढारी वृत्तसेवा

शहरालगत असलेल्या झरी (ता.लोहा) येथील खदानीच्या पाण्यात बुडून ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडली. मृत झालेले चारही युवक हे देगलूरनाका नांदेड येथील रहिवाशी आहेत. झरी

विष्णुपुरी लगत असलेल्या झरी येथे मोठी खदान आहे. येथे पोहोचण्यासाठी व फिरण्यासाठी गेलेल्या देगलूर नाका नांदेड येथील ४ युवकांचा पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैर्वी घटना आज (मंगळवार) सकाळी घडली. यात शेख शेख फुज्जाइल (वय १८ रा. देगलूर नाका), सय्यद सिद्दिक (वय १७, रा. टायर बोर्ड देगलूर नाका कमान,) काजी मुजम्मिल(वय १८, रा.देगलूर नाका), अफान (वय १८,रा. देगलूर नाका) अशी त्यांची नावे आहेत.

सदर घटनेमध्ये देगलूर नाका भागातील चौघेजण झरी परिसरामध्ये फिरण्यासाठी म्हणून घरातून मंगळवारी सकाळी गेले होते. चौघांनाही पोहता येत नव्हते. सुरुवातीला पाण्यामध्ये एक जण उतरला. त्याला वाचण्यासाठी दुस-याने पाण्यात उडी मारली असे एकूण चौघेही पाण्यात उतरले. मात्र एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्यासाठी नांदेड येथील अग्निशामक दलाच्या पथकासह देगलूरनाका व झरी येथील नागरिकांसोबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांना सुरुवातीस दोन आणि नंतर काही वेळाने दोन अशी चौघांची मृतदेह आढळून आले आहेत. सदर घटनेबाबत सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news