Nanded News : मांसविक्री दुकानांचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट शाळेच्या मैदानात

मांसविक्रीच्या दुकानांमुळे शालेय विद्यार्थिनींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Nanded News
Nanded News : मांसविक्री दुकानांचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट शाळेच्या मैदानातfile photo
Published on
Updated on

Foul-smelling water from meat shops flows directly onto the school playground

मुखेड : शहरातील नांदेड-बिदर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या 'पीएमश्री जिल्हा परिषद मुलींच्या हायस्कूल'समोरील अतिक्रमित मांसविक्रीच्या दुकानांमुळे शालेय विद्यार्थिनींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या दुकानांमधील दुर्गंधीयुक्त घाण सांडपाणी थेट शाळेच्या मैदानात सोडले जात असून, यामुळे तब्बल १२,०० हून अधिक मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे अतिक्रमित गाळे त्वरित हटवून मुख्य महामार्ग मोकळा करावा, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजल येलमवाड यांनी मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मैदानात सांडपाणी; कुत्र्यांचा सुळसुळाट

या पीएमश्री शाळेत शहरासह परिसरातील जवळपास १२,००० हून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेच्या अगदी दर्शनी भागात राष्ट्रीय महामार्गावर तीन ते चार मासविक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांमधून निघणारे कचरा आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट शाळेच्या खेळण्याच्या मैदानात पसरत आहे.

याबाबत शाळा प्रशासनाने संबंधित दुकानदारांना वारंवार तोंडी सूचना दिल्या, मात्र दुकानदारांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या घाणीमुळे शाळेच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, विद्यार्थिनी आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.

या अनधिकृत दुकानांमुळे मुखेड शहराच्या सौंदर्याला आणि वैभवाला गालबोट लागत आहे. यापूर्वीही ही दुकाने इतरत्र हलवण्यासाठी अनेकदा मागण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, नगर परिषद प्रशासनाने यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमधून आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news