

मुखेड : लोहा तालुक्यातील घेटका गावातील एका शेतात मगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी (दि.११) पहाटे १ च्या सुमारास एका शेतकऱ्याला ही मगर दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सरपंच संग्राम सुरनर यांनी वनपाल धोडगे यांना याची माहिती दिली.
त्यानंतर वनपाल शंकर धोडगे, वनरक्षक अरुण राठोड, सर्पमित्र सिध्दार्थ कांबळे, नादिन शेख यांनी वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी धाव घेत मगरीला सुरक्षितरित्या जेरबंद केले. तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात मगरीवर उपचार करण्यात आले. शेतातील महाकाय मगरीला पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.