Farmer Electric Shock Death | शेतकऱ्याचा विद्युतपंप चालवताना करंट लागून दुर्दैवी मृत्यू

Irrigation Pump Tragedy | रोगग्रस्त पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी गेलेल्या किरवले यांनी पाणी भरण्यासाठी विद्युतपंप सुरू करताना अचानक करंटचा झटका बसल्याने ते घटनास्थळीच मृत्युमुखी पडले.
Farmer Electric Shock Death
गजानन किरवले(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Farmer Electric Pump Accident

किनवट : तालुक्यातील दूधगाव (प्रधानसांगवी) येथील शेतकरी गजानन पांडुरंग किरवले (वय 42) यांचा सोमवारी (दि. 08 सप्टेंबर) सकाळी दुर्दैवी विद्युत अपघातात मृत्यू झाला आहे. रोगग्रस्त पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी गेलेल्या किरवले यांनी पाणी भरण्यासाठी विद्युतपंप सुरू करताना अचानक करंटचा झटका बसल्याने ते घटनास्थळीच मृत्युमुखी पडले.

शक्यता आहे की, जुना झालेला विद्युतपंप व त्यातील खराब वायरिंगमुळे शेतकऱ्याला करंटचा झटका बसला असावा किंवा कदाचित पंपाशी संबंधित सॉकेटमध्ये वीज पुरवठा करताना वीज सर्किटमध्ये योग्य संरक्षण न झाल्याने किंवा शॉर्ट सर्किटमुळे हा दुर्दैवी प्रकार घडला असण्याची शक्यता आहे, अशी घटनास्थळी चर्चा होती, असे एका ग्रामस्थाने सांगितले.

Farmer Electric Shock Death
Nanded News : नांदेडमधील 'पीव्हीआर'ला २ कोटींचा दंड

पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. पुढे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला गेला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गजानन किरवले यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.

Farmer Electric Shock Death
Kinwat Taluka Water Storage | किनवट तालुक्यातील २१ जलप्रकल्पांत ७०. ४५ टक्के उपयुक्त जलसाठा

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, शेकडो नागरिकांनी या दुर्देवी कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तालुका प्रशासनाने देखील विद्युतसुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांना सुरक्षित पद्धतीने वीज संयंत्र व पंप यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून अशा दु:खद प्रसंगांची पुनरावृत्ती होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news