Illegal sand mining : गोदावरी पात्रात वाळू उपसा करणारे ४९ लाखांखे साहित्य नष्ट

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० तराफे आणि ९ इंजिन केले नष्ट
illegal sand mining
Illegal sand mining : गोदावरी पात्रात वाळू उपसा करणारे ४९ लाखांखे साहित्य नष्टFile Photo
Published on
Updated on

Equipment worth ₹49 lakhs used for sand dredging in the Godavari riverbed was destroyed

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने आक्रमक पाऊल उचलले असून, ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदी पात्रात मोठी कारवाई केली आहे.

illegal sand mining
Nanded illegal sand mining : पोलिसांची मोठी कारवाई; गोदावरी पात्रातील 25 लाखांचे साहित्य नष्ट

मार्कंडेश्वर शिवारात नदी पात्रातून अनधिकृतपणे वाळूचा उपसा करून तिची चोरटी विक्री करणाऱ्या टोळीवर छापा टाकत पोलिसांनी एकूण ४९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे ४० तराफे आणि ९ इंजिन घटनास्थळावरच जाळून नष्ट केले.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मार्कंडेश्वर शिव-ारातील गोदावरी नदी पात्रात काही इसम तराफ्यांच्या सहाय्याने वाळू काढून तिची चोरटी विक्री करण्यासाठी नदीकाठावर साठवणूक करत आहेत. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने २२ मे रोजी पहाटे ०१.४५ वाजण्याच्या सुमारास मार्कंडेश्वर शिवारातील गोदावरी नदी किनाऱ्यावर छापा टाकला.

illegal sand mining
illegal sand mining : गोदावरी पात्रात ऑपरेशन क्रूक डाऊन; 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

नदी पात्रात तराफ्यांच्या सहाय्याने वाळू काढण्याचे काम सुरू असताना पोलिसांचे वाहन पाहताच अंधाराचा फायदा घेऊन दोन अनोळखी इसम घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे मोठ्या प्रमाणावर वाळू उपशाचे साहित्य आढळून आले.

या कारवाईत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार वसंत वेडे, मारोती पचलिंग, हानवता कदम, हनमंत तेलंग, समीर अहमद, धम्मपाल कांबळे आणि चालक विनोद पवार यांनी सहभाग घेतला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मारोती पचलिंग यांच्या फिर्यादीवरून पळून गेलेल्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४९ लाखांचा मुद्देमाल; घटनास्थळावरच केली होळी

पाण्यात तरंगणारे आणि वाळू वाहून आणणारे ४० तराफे त्याची किंमत २० लाख रुपये व यातील २० तराफ्यांवर ४० ब्रास वाळू असा एकूण २२ लाख रुपयांचा माल. वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रत्येकी ३ लाख रुपये किमतीचे ९ मोठे इंजिन ज्याची किंमत २७ लाख रुपये आहे. तर तराफ्यांवरील ४० ब्रास वाळू पुन्हा नदी पात्रात टाकून नष्ट करण्यात आली. नदीकाठावरील २५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news