

नांदेड : भाजप नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत मतदारांना सर्वांचे मटण खाऊन केवळ भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडहओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, सध्या निवडणूक सुरू आहे. सर्वच लोक पार्ट्या खाऊ घालतील. याची पार्टी, त्याची पार्टी... मी तर म्हणेन रोज खा मटण, पण कमळाचे दाबा बटण. एवढे काम करा. नाही तर एकाचे मटण खाऊन दुसर्याला मतदान कराल. मी काही मटण देणार नाही, पण सांगितलेले लक्षात घ्या. जे गेले त्यांना जाऊ द्या. मला काही फरक पडत नाही.
अशोक चव्हाण यांच्या विधानावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, अच्छा, अशोक चव्हाण का? मला वाटले, आदर्श चव्हाण. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा असे अजिबात करत नव्हते. आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृतीही बदलली आहे.