भाजपमुळेच मुखेड मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आघाडीवर : आ. डॉ. राठोड

भाजपमुळेच मुखेड मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आघाडीवर : आ. डॉ. राठोड
Tushar Govindrao Rathod
भाजपमुळेच मुखेड मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आघाडीवर : आ. डॉ. राठोड Tushar Govindrao Rathod
Published on
Updated on

मुखेड, पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक प्रगती करत आहे. विकासाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. भाजपच्या काळात आपण मतदारसंघात सर्वाधिक विकासकामे केली आहेत. तसेच आगामी काळातही आणखी विकासकामे मंजूर करून आणणार आहे. त्यामुळे मला पुन्हा सेवेची संधी द्यावी, असे आवाहन आमदार तुषार राठोड यांनी केले.

मुखेड-कंधार विधानसभा चांडोळा मतदारसंघातील जि.प. गटातील भगनुरवाडी, चांडोळा, कोळगाव, हिब्बट, मोटरगा, माउली, धामणगाव, करणा येथे ३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा बुधवारी दि. २ ऑक्टोबर रोजी शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी व्यंकटराव पाटील चांडोळकर, खुशालराव पाटील उमरदरीकर, लक्ष्मन पाटील खैरकेकर, गौतम काळे डॉ माधव पाटील उच्वेकर, डॉ शारदाताई हिमगिरे, संतोष बोनलेवाड, शिवलिंग नाईक, डॉ. रणजित काळे, दत्ता पाटील बेटमोगरेकर सचिन श्रीरामे, हणमंत नरोटे, बालाजी पाटील सकनूरकर, राम पाटील चांडोलकर, संतोष बोनलेवाड, डॉ. रणजित काळे, नागोराव पाटील श्रीरामे नारायण पाटील सदगीर, बालाजी गवते, मनोज कांबळे, गोविद भालके, अदनान पाशा, सूर्यकांत शेळके, बाळू नाईक, किशोरसिहं चौहान, श्रीनिवास राठोड, गोविंद पाटील आदींची उपस्थिती होती.

भगनुरवाडी येथे ८ कोटी ७ लाख, चांडोळा येथे ३ कोटी ९४ लाख, कोळगाव येथे ३ कोटी २० लाख, हिव्बट येथे ६ कोटी ४२ लाख, मोटर्गा येथे ४ कोटी ७७ लाख, धामणगाव येथे २ कोटी ४१ लाख, माउली येथे २ कोटी ९१ लाख, धामणगाव येथे १ कोटी ५६ लाख, कर्णा येथे ७ कोटी ३ लाख ३८ कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.

शिवाजी माधवराव श्रीरामे, गंगाधर लाकडोबा जाधव, श्रीकांत बाबाराव वडजे, हणमंत विठ्ठलराव श्रीरामे, देविदास कोंडिबा साखरे, इरवंत गंगाराम हिमगिरे, बालाजी लक्ष्मन श्रीरामे, रघुनाथ गंगाराम दुबेवाड, सुरेश विठ्ठल गायकवाड, पांडुरंग व्यंकटराव सावरगावे, संजय केंद्रे, संभाजी मुंडे महाराज, बाबुराव भुजंग कागणे, सतीश मुंडे, मोहन गायकवाड, हणमंत मुंडे, माधव कांगणे संतोष मुंडे, माधव केंद्रे, संभाजी अण्णाराव मुंडे, हणमंत पाटील, पांडुरग पाटील, बालाजी बोईनवाड, संतोष पाटील इंगळे, संतोष झिकवाड, धोंडिबा झिकवाड, बालाजी मेथेवाड, रामदास चिकटवाड, गोपाळ महाराज झिकवाड, शिवाजी जायभाये इंगळे, उत्तम बॉईनवाड, नामदेव पिल्लेवाड, रणजित पाटील भालके, गंगाधर पाटील इंगळे, त्रंबक नागोराव हेलगिरे, बाबू पाटील वडजे, डॉ अनिल हेलगिरे, संजय मुंडकर, वसंत चंदापुरे, बाबू चंदापुरे, ओमप्रकाश वानोले, बाबा पटेल, बिनोद चंदापुरे, संगम बानोले, मारोती पाटील चंदापुरे यांच्यासह हजारो नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

सामान्य माणूस हाच राठोड कुटुंबाचा कणा

मुखेड तालुक्यात सोयाबीन काढणी वेगाने सुरू आहे असून शेतात सर्वत्र मजूरदार महिलांची वानवा जाणवत आहे. आ. डॉ. तुषार राठोड यांच्या विकास कामांचा शुभारंभ सोहळ्यास शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी उसळत आहे. मी केलेल्या कामांची हीच खरी पावती असून सर्व सामान्य नागरिक, ग्रामस्थ हेच राठोड कुटुंबाचे अनेक वर्षांपासूनचा कणा तथा विश्वासाहर्ता असल्याचे आ. राठोड यांनी सांगितले आहे.

Tushar Govindrao Rathod
तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार : मुख्यमंत्री शिंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news